26.1 C
Mālvan
Monday, July 15, 2024
IMG-20240531-WA0007

तळेरे येथे जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

तळेरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील श्रावणी कंप्युटर आणि अक्षरोत्सव परिवाराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संगीतकार गीतकार प्रणय शेट्ये आणि ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार, कवी – अभिनेते प्रमोद कोयंडे, तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे अध्यक्ष उदय दुधवडकर, संजय खानविलकर, स्पर्धेचे परीक्षक अभिजित राणे, श्रावणी कंप्युटरचे संचालक सतीश मदभावे, अक्षरोत्सव परिवार प्रमुख निकेत पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत तीन गटात मिळून एकूण ४०९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. या स्पर्धेसाठी शेषनाथ दामोदर मराठे यांनी सर्व बक्षिसे पुरस्कृत केली होती.

यापुढील स्पर्धेची घोषणा निकेत पावसकर यांनी यावेळी केली असून यावर्षी संवेदनशील कवी, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्या सामाजिक विषयावरच्या दोन कविता स्पर्धेसाठी देण्यात आल्या आहेत. ही स्पर्धा १ ते ४ थी, ५वी ते ८ वी व ९ वी ते १२ वी अशा तीन गटात होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

तळेरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील श्रावणी कंप्युटर आणि अक्षरोत्सव परिवाराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संगीतकार गीतकार प्रणय शेट्ये आणि ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार, कवी - अभिनेते प्रमोद कोयंडे, तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे अध्यक्ष उदय दुधवडकर, संजय खानविलकर, स्पर्धेचे परीक्षक अभिजित राणे, श्रावणी कंप्युटरचे संचालक सतीश मदभावे, अक्षरोत्सव परिवार प्रमुख निकेत पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत तीन गटात मिळून एकूण ४०९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. या स्पर्धेसाठी शेषनाथ दामोदर मराठे यांनी सर्व बक्षिसे पुरस्कृत केली होती.

यापुढील स्पर्धेची घोषणा निकेत पावसकर यांनी यावेळी केली असून यावर्षी संवेदनशील कवी, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्या सामाजिक विषयावरच्या दोन कविता स्पर्धेसाठी देण्यात आल्या आहेत. ही स्पर्धा १ ते ४ थी, ५वी ते ८ वी व ९ वी ते १२ वी अशा तीन गटात होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

error: Content is protected !!