मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे येथील श्री भगवती हायस्कूल व स्व. वीणा सुरेश बांदेकर ज्यूनियर काॅलेजचा बारावीचा निकाल १००% लागला आहे. अकौंटिंग आणि ऑटोमोबाईल या दोन ट्रेड मधून २६ विध्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये प्रथम क्रमांक विनेक संजय भोगले (८६.००%), द्वितीय क्रमांक भागोजी राजेंद्र साळकर (८१.३३%), तृतीय क्रमांक अमिषा अनिल रुपये (७५.६७%) यांनी यश प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था व प्रशालेच्या वतीने अभिनंदन होत आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -