23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

दुर्गाच्या डोंगरावरील दुंडा गडाच्या माहिती फलकांचे अनावरण.

- Advertisement -
- Advertisement -

दुर्गप्रेमींसाठी दुंडा गडावरील विविध सोयीं सुविधांसाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे चाफेड सरपंच किरण मेस्त्री यांचे प्रतिपादन.

शिरगांव | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या चाफेड येथील दुर्गाच्या डोंगरातील दुंडा गडावर रविवारी दि. १९ मे रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व चाफेड ग्रामस्थांच्यावतीने, गडाला भेट देणार्यांच्या सुलभतेसाठी गडावर जाणाऱ्या वाटेवर तसेच महत्वाच्या वास्तूंच्या ठिकाणी माहितीदर्शक फलक लावण्यात आले. यामध्ये गडावर जाणाऱ्या मार्गांवर पाच फलक, घोड्याची पाग, दुर्गाचा चाळा, राजवाडा, विहीर, मुख्य दरवाजा, बुरुज याठिकाणी सहा असे एकूण अकरा फलक यावेळी लावण्यात आले. भविष्यात या गडाचे संवर्धन आणि संशोधन होण्याच्या दृष्टीने तसेच दुर्गप्रेमीना चांगल्या प्रकारे पाहाता यावा, त्यांना अभ्यास करता यावा यासाठी विविध माध्यमातून आपण ग्रामपंचायतीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने असे प्रयत्न सुरु ठेवणार असल्याचे यावेळी सरपंच किरण मेस्त्री यांनी सांगितले.

या मोहिमेला चाफेड सरपंच किरण मेस्त्री, भजनीबुवा महेश उर्फ बबन परब, साईल पांचाळ, माजी सरपंच संतोष साळसकर, माजी सरपंच आकाश राणे, प्रदिप घाडी, तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे कोकण विभागीय अध्यक्ष गणेश नाईक, समिल नाईक, हृदयनाथ गावडे, उत्कर्षा वेंगुर्लेकर, हेमलता जाधव, प्रसाद पेंडूरकर, जालिंदर कदम, वेदांत वेंगुर्लेकर, ऋतुराज सावंत, अक्षय जाधव, प्रविण नाईक आदी उपस्थित होते.

साईप्रसाद मसगे, उत्कर्षां वेंगुर्लेकर, स्मिता जाधव, सुजल ऍग्रो केअर मार्ट, हेमलता भास्कर जाधव, समीक्षा मोहन माळकर, स्मिता सुनिल कोदले, साक्षी खरात, आरती मकरंद वायंगणकर, विजय सावंत,अभिनव रामचंद्र भिंगारे, संगम श्रीकृष्ण चव्हाण यांनी मार्गदर्शक फलकांसाठी तसेच चाफेड ग्रामपंचायत सरपंच किरण मेस्त्री यांनी फालकांच्या पोलांसाठी तसेच सिमेंट, वाळू, खडी यांच्यासाठी आर्थिक सौजन्य केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!