शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील चाफेड पिंपळवाडी येथील ज्येष्ठ गणेश मूर्तिकार वामन राजाराम मेस्त्री ( वय ८५ वर्षे ) यांचे शुक्रवारी १७ मे रोजी, पहाटे ३ वाजता निधन झाले. ते गणेश मूर्तिकार म्हणून दशक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यांच्या चित्रशाळेत दरवर्षी अनेक गणेश मूर्ती त्यांनी घडविण्याचे काम केले. तसेच त्यांची सुतारशाळा पिढ्यानपिढ्या चालू होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
चाफेड – पिंपळवाडी येथील ज्येष्ठ गणेश मूर्तिकार वामन मेस्त्री यांचे निधन.
95
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -