26.1 C
Mālvan
Thursday, October 24, 2024
IMG-20240531-WA0007

गीतकार विजय जोशी (विजो यांचा सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते सत्कार.

- Advertisement -
- Advertisement -

ब्युरो न्यूज : स्वरकुल ट्रस्ट आणि त्यागराज म्युझिक अकॅडमी निर्मित ‘तिमिरातुनि तेजाकडे’ ह्या भारतातील पहिल्या अंध दिव्यांग गायकांची दहा गाणी समाविष्ट असलेल्या संगीत अल्बमचे प्रकाशन ज्येष्ठ गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे नुकतेच संपन्न झाले. या अल्बम मध्ये मसुरे, खेरवंद वाडीचे सुपुत्र कवी गझलकार समीक्षक साहित्यिक व गीतकार विजय जोशी (विजो ) यांच्या ‘जगात या फुलायचे’ या गाण्याचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ निर्माती, दिग्दर्शिका व सब टीव्ही चॅनेल्सच्या प्रमुख कांचन अधिकारी, हास्यजत्रा फेम अभिनेते अरुण कदम, विजय पाटकर, प्रमोद पवार, विनय येडेकर, अलबमचे संगीतकार आणि त्यागराज म्युझिक अकॅडमीचे प्रमुख त्यागराज खाडिलकर, स्वरकुल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. वीणा खाडिलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

प्रकाशन सोहळ्यात अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते सर्व विजय जोशींसह सहभागी गीतकारांचा आणि गायकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन आणि संकल्पना डॉ. वीणा त्यागराज खाडिलकर यांची होती.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ब्युरो न्यूज : स्वरकुल ट्रस्ट आणि त्यागराज म्युझिक अकॅडमी निर्मित 'तिमिरातुनि तेजाकडे' ह्या भारतातील पहिल्या अंध दिव्यांग गायकांची दहा गाणी समाविष्ट असलेल्या संगीत अल्बमचे प्रकाशन ज्येष्ठ गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे नुकतेच संपन्न झाले. या अल्बम मध्ये मसुरे, खेरवंद वाडीचे सुपुत्र कवी गझलकार समीक्षक साहित्यिक व गीतकार विजय जोशी (विजो ) यांच्या 'जगात या फुलायचे' या गाण्याचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ निर्माती, दिग्दर्शिका व सब टीव्ही चॅनेल्सच्या प्रमुख कांचन अधिकारी, हास्यजत्रा फेम अभिनेते अरुण कदम, विजय पाटकर, प्रमोद पवार, विनय येडेकर, अलबमचे संगीतकार आणि त्यागराज म्युझिक अकॅडमीचे प्रमुख त्यागराज खाडिलकर, स्वरकुल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. वीणा खाडिलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

प्रकाशन सोहळ्यात अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते सर्व विजय जोशींसह सहभागी गीतकारांचा आणि गायकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन आणि संकल्पना डॉ. वीणा त्यागराज खाडिलकर यांची होती.

error: Content is protected !!