24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

कुडाळ कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

व्यावसायिक प्रमोद नलावडे आणि सवंगडी यांनी व्यक्त केले मनोगत.

शिरगांव | संतोष साळसकर : कुडाळ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेच्या १९७९ – ८० बॅचचा स्नेहमेळावा कुडाळ तालुक्यातील कोकण हेरिटेज रिसॉर्ट मुळदे येथे संपन्न झाला. गुरूजनांनी घालून दिलेली शिस्त आजही आपल्या गृपमध्ये दिसून येते ती तशीच पुढे राहो. वाचण्याचा छंद असाच कायमस्वरूपी जोपासा असे आवाहन यावेळी प्रसिद्ध व्यावसायिक प्रमोद नलावडे यांनी केले.

‘नाते विश्वासाचे’ ही टॅगलाईन घेऊन चालणारा आणि मैत्रीचा खरा अर्थ सांगणारा हा सोहळा २०१६ पासून सूरू झाला असून तो प्रत्येक वर्षी त्याच एकजुटीने संपन्न होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्गातील माजी विद्यार्थी महेश भांडारकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून देवगड येथील प्रसिद्ध व्यावसायिक प्रमोद नलावडे होते. या दरम्यान , ३१ मे २०२४ सेवानिवृत्त होणारे विनायक परब (गोवा) यांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला. परब यांनी कृतज्ञता व्यक्त करून आपल्या भावना गोवन कोंकणी भाषेत व्यक्त केल्या.

दुपारच्या सत्रात महेश भांडारकर, मधुकर कुबल यांचा सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम झाला. शोभा राऊळ यांनी सुंदर दोन कथा सांगितल्या. प्रकाश कोचरेकर यांनी योगाचे महत्व तर अनिल गावडे यांनी सामाजिक बांधिलकी कशी असावी याची माहिती दिली. राजन कांबळी, नंदकिशोर बोर्डवेकर यांनी ग्रुपचे महत्व सांगितले. दिलीप प्रभू खानोलकर यांनी गृपमधील सर्वांच्या मनातील भावनांचे विवेचन केले. या कार्यक्रमास दिगंबर सडवेलकर, किशोर शिरसेकर, विनायक परब, रवी नेवाळकर, महेश भंडारकर, मधू कूबल, दीलीप प्रभूखानोलकर, संतोष आंबडोसकर, शरद आकेरकर, अनील गावडे, लक्ष्मण मेस्त्री, प्रकाश कोचरेकर, दिनकर वालावलकर, अशोक मेस्त्री, राजन कांबळी, नंदकिशोर बोर्डवेकर, सुमंगल परब नलावडे, पुष्पलता बोभाटे भिसे, सुधा रेगे केणी, गीता दाभोलकर, शोभा राऊळ, सुनीता वालावलकर प्रभू तेंडुलकर, हेमलता दांडेकर मराठे उपस्थित होते. संकल्पना विनायक परब, किशोर शिरसेकर, सुधा रेगे, संयोजन दिनकर वालावलकर, संतोष आंबडोसकर, गीता दाभोलकर, तर आभार मधू कूबल, शरद आकेरकर यांनी मानले.

फॅमिली स्नेह मेळावा ही नवीन संकल्पना अशोक मेस्त्री यांनी व्यक्त केली. तसा ठराव किशोर शीरसेकर यांनी मांडला. पूढील गेट टुगेदर कुडाळ येथे १८ मे २०२५ रोजी होईल याची घोषणा शरद आकेरकर यांनी केली. पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन सर्वजण आठवणीची शिदोरी घेऊन घरी परतले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

व्यावसायिक प्रमोद नलावडे आणि सवंगडी यांनी व्यक्त केले मनोगत.

शिरगांव | संतोष साळसकर : कुडाळ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेच्या १९७९ - ८० बॅचचा स्नेहमेळावा कुडाळ तालुक्यातील कोकण हेरिटेज रिसॉर्ट मुळदे येथे संपन्न झाला. गुरूजनांनी घालून दिलेली शिस्त आजही आपल्या गृपमध्ये दिसून येते ती तशीच पुढे राहो. वाचण्याचा छंद असाच कायमस्वरूपी जोपासा असे आवाहन यावेळी प्रसिद्ध व्यावसायिक प्रमोद नलावडे यांनी केले.

'नाते विश्वासाचे' ही टॅगलाईन घेऊन चालणारा आणि मैत्रीचा खरा अर्थ सांगणारा हा सोहळा २०१६ पासून सूरू झाला असून तो प्रत्येक वर्षी त्याच एकजुटीने संपन्न होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्गातील माजी विद्यार्थी महेश भांडारकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून देवगड येथील प्रसिद्ध व्यावसायिक प्रमोद नलावडे होते. या दरम्यान , ३१ मे २०२४ सेवानिवृत्त होणारे विनायक परब (गोवा) यांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला. परब यांनी कृतज्ञता व्यक्त करून आपल्या भावना गोवन कोंकणी भाषेत व्यक्त केल्या.

दुपारच्या सत्रात महेश भांडारकर, मधुकर कुबल यांचा सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम झाला. शोभा राऊळ यांनी सुंदर दोन कथा सांगितल्या. प्रकाश कोचरेकर यांनी योगाचे महत्व तर अनिल गावडे यांनी सामाजिक बांधिलकी कशी असावी याची माहिती दिली. राजन कांबळी, नंदकिशोर बोर्डवेकर यांनी ग्रुपचे महत्व सांगितले. दिलीप प्रभू खानोलकर यांनी गृपमधील सर्वांच्या मनातील भावनांचे विवेचन केले. या कार्यक्रमास दिगंबर सडवेलकर, किशोर शिरसेकर, विनायक परब, रवी नेवाळकर, महेश भंडारकर, मधू कूबल, दीलीप प्रभूखानोलकर, संतोष आंबडोसकर, शरद आकेरकर, अनील गावडे, लक्ष्मण मेस्त्री, प्रकाश कोचरेकर, दिनकर वालावलकर, अशोक मेस्त्री, राजन कांबळी, नंदकिशोर बोर्डवेकर, सुमंगल परब नलावडे, पुष्पलता बोभाटे भिसे, सुधा रेगे केणी, गीता दाभोलकर, शोभा राऊळ, सुनीता वालावलकर प्रभू तेंडुलकर, हेमलता दांडेकर मराठे उपस्थित होते. संकल्पना विनायक परब, किशोर शिरसेकर, सुधा रेगे, संयोजन दिनकर वालावलकर, संतोष आंबडोसकर, गीता दाभोलकर, तर आभार मधू कूबल, शरद आकेरकर यांनी मानले.

फॅमिली स्नेह मेळावा ही नवीन संकल्पना अशोक मेस्त्री यांनी व्यक्त केली. तसा ठराव किशोर शीरसेकर यांनी मांडला. पूढील गेट टुगेदर कुडाळ येथे १८ मे २०२५ रोजी होईल याची घोषणा शरद आकेरकर यांनी केली. पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन सर्वजण आठवणीची शिदोरी घेऊन घरी परतले.

error: Content is protected !!