संबंधीत व्यवस्थापकांनी दिली तत्काळ उपाययोजनेची हमी.
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या नेरुर गोधयाळे ग्रामस्थ व एमआयडीसी मधील रहिवासी यांनी धान्य गोडाऊनमधील कपड्यांच्या उपद्रवाबाबत एमआयडीसी मधील धान्य गोडाऊनच्या व्यवस्थापकांची भेट घेतली. या गोडाऊन मधील धान्याला पडलेला टोका (किडा) याचा त्रास आजूबाजूच्या रहिवासी व नेरुर गोंधयाळे येथील ग्रामस्थांना होत असल्याचे निवेदन त्यांनी यावेळी दिले. या निवेदना द्वारे ग्रामस्थांनी सांगितले की संध्याकाळी सहाच्या नंतर या किड्याचा त्रास मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रात्री झोपणे अवघड झाले असून घरातील लहान मुलांना पण याचा त्रास होऊ शकतो असे निवेदनात नमूद केले. तसेच घरातील अन्नधान्य यालाही मोठ्या प्रमाणात टोका लागणार आहे. या संदर्भात व्यवस्थापकीय अधिकारी यांना याबाबत तात्काळ उपयोजना करण्यासंदर्भात पत्र व्यवहार केला व चर्चा केली जेणेकरून कोणाच्याही जीवाला धोका अथवा धान्य खराब होऊ नये यासाठी आपल्याकडून तात्काळ उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी केली. त्यानंतर त्यातील अधिकारी यांनी याबाबत आपण तात्काळ उपाययोजना करतो व आपल्याला त्रास होणार याची काळजी घेतो असे सांगत याबाबत सकारात्मक हमी दिली.
यावेळी नेरूर माजी सरपंच शेखर गावडे, अजित मार्गी, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद गावडे, रामा कांबळी, मंगेश राऊत, आपा धोंड, किशोर सामंत, शेगले काका व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.