५८ महाराष्ट्र एन सी सी बटालियन सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने श्रृती होणार सहभागी.
खारेपाटण : पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलची एन सी सी कॅडेट विद्यार्थिनी कु. श्रुती ब्रम्हा जामसंडेकर हीची तामिळनाडू येथे होणाऱ्या निलगिरी ट्रेक कॅम्प साठी महाराष्ट्र राज्यातून निवड झाली असून तिच्या या निवडी बद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. कु. श्रुती जामसंडेकर हिचे नुकतेच खारेपाटण हायस्कूलच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व सत्कार केला. यावेळी खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे, शाळेचे शिक्षक एल. के. हरयान, तसेच शाळेचे शिक्षक व एन सी सी ऑफिसर रामदास कापसे आदी मान्यवर शिक्षक उपस्थित होते.
तामिळनाडू येथे दी. १६ मे ते २३ मे २०२४ दरम्यान होणाऱ्या निलगिरी ट्रेक कॅम्प करीता कु. श्रृती जामसंडेकर ही लवकरच रवाना होणार असून ५८ महाराष्ट्र एन सी सी बटालियन सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने कु. श्रुती जामसंडेकर हीची निवड झाली आहे. तर खारेपाटण हायस्कूलचे शिक्षक व एन सी सी ऑफिसर रामदास कापसे यांचे तिला बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सेक्रेटरी महेश कोळसुलकर सर्व संचालक शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप पर्यवेक्षक संतोष राऊत व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.