आचरा | विवेक परब : भातशेती लागवड पूर्ण झाल्यानंतर शेतकरी भुईमूग, नाचणी या पिकांच्या पेरणी-लागवडीकडे वळतो. सध्या पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे आचरा परिसरांतील शेतकरी वर्ग भुईमूग पेरणीकडे वळला आहे. आचरा-चिंदर माळरानावर सध्या सामूहिक भुईमूग पेरणीची लगबग जोरदार चालू आहे. सध्या निसर्गाने नटलेल्या आचरा माळरानावर भुईमूग पेरणी करतानाचे चित्र देखील थोडे सुखद असेच आहे. सिंधुदुर्गातील शेतकर्याचा नगदी पिकांकडे जास्त कल नसला तरी भुईमूगासारखी उत्पादने शेती सहकारी तत्वावर करणे हा शेतीविषयक एक नविन आयाम आता ते गाठू शकत आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -