खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या कासार्डे – तांबळवाडी येथील श्री आवळेश्वर मंदिरात आज दि.२ व ३ मे रोजी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ मे रोजी वाडीतील मुलाचे व महिलांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ मे रोजी श्री सत्यनारायण महापूजा तसेच, विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ९ वाजता अभिषेक, सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, ३ ते ५ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू, संध्याकाळी ५ ते ८ स्थानिक भजने आणि रात्री ९ नंतर आमनेसामने तिरंगी भजनांचा जंगी सामना रंगणार आहे. श्री देवी सातेरी प्रासा. भजन मंडळ पावशी (कुडाळ) येथील बुवा अरुण घाडी व श्री काटेश्वर प्रासा. भजन मंडळ हरकुळ (बुद्रुक) येथील बुवा अभिषेक शिरसाट यांचा २००२० डबलबारी भजनाचा जंगी सामना रंगणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आवळेश्वर देवस्थान कासार्डे तांबळवाडी यांनी केले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -