गवंडीवाडा येथील श्री राम मंदिर येथे श्रीफळ अर्पण करून बूथ क्रमांक ९५ मध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या घरोघरी प्रचाराचा आरंभ.
मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीतील सर्वच पक्षांनी गावा गावातील प्रचाराचा धडाका सुरू ठेवला असून मतदाराने केंद्रीय मंत्री मा. श्री. नारायण राणे साहेबां सारख्या नेतृत्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वासामान्य जनतेतून मिळणारा प्रतिसाद पाहता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री मा. श्री. नारायण राणे साहेब सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी व्यक्त केला आहे. मालवण शहरातील गवंडीवाडा येथील श्री राम मंदिर येथे श्रीफळ अर्पण करून बूथ क्रमांक ९५ मध्ये घरोघरी प्रचाराचा आरंभ आज करण्यात आले.
सर्वच ठिकाणी जनता राणे साहेबांना साथ देणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे अशी प्रतिक्रिया सौरभ ताम्हणकर यांनी दिली. महायुतीचे सर्व पक्ष रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कार्यरत आहेत असेही ते म्हणाले.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर, भारतीय जनता युवा मोर्च्याचेजिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत,भारतीय जनता युवा मोर्चा शहर सरचिटणीस निशय पालेकर, माजी नगरसेविका शर्वरी पाटकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, बूथ प्रमुख दादा कोचरेकर, चित्रा हळमळकर, आरती कोडचवाडकर, अनिशा कवटणकर, राजन परुळेकर, सर्वेश येमकर, तन्मय पराडकर, अरुण जाधव, परेश वाघ, विल्सन परेरा, तुषार खराडे, सागर पाटकर, आदेश कोचरेकर, समीर मुंबरकर, राजू कुबल, चेतन हळमळकर, विनय हळमळकर, बबन गांवकर, राजू मोरजकर, जीवन घुमाळ, चारुदत्त हिंदळेकर, प्रशांत गवंडी, अंजली गवंडी, दिशा पाटकर, गायत्री गवंडी, चित्रा वस्त, प्रसाद गवंडी, वेदा पाटकर, राजा पराडकर, दिवाकर जाधव, आदित्य मोर्जे, तन्मय येमकर, डिगू पाटील, विकास पांचाळ, निकिता गवंडी, बंड्या गवंडी, अमित सावंत, उमेश मेस्त्री यांसह अन्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.