सिंधुदुर्ग : १ मे महाराष्ट्र दिन आणि सिंधुदुर्ग स्थापना दिना निमित्त सिंधू रनर टीम ने गोवा ते सावंतवाडी इंटरसिटी १०० किलोमीटर ची अल्ट्रा रन आयोजित करण्यात आली आहे. या अल्ट्रा रनची सुरवात ३० एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता श्री देवी नवदुर्गा मंदिरातुन (बोरी फोन्डा गोवा) इथून साऊथ गोवा चे विधानसभा उमेदवार संकेत नाईक मुळे आणि माजी मुख्याध्यापक श्री माथूरदास नाईक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नंतर फोन्डा, मंगेशी, पणजी अट्टल सेतू, पर्वोरीम, धारगळ, तम्बोसा, बांदा मार्गे सावंतवाडी असे १०० किलोमीटर धावक सावंतवाडी राजवाडा येथे १ मे दिवशी सकाळी ९ वाजता पोचतील. या रन मध्ये सिंधुदुर्गातील १० तर इतर भागातून ६ धावत सहभागी झाले आहेत.
सहभागी धावक खालील प्रमाणे आहेत.
१. ओंकार पराडकर
२. प्रसाद कोरगावकर
३. डॉ स्नेहल गोवेकर
४. भूषण बान्देलकर
५. भूषण पराडकर
६. ऋषिकेश लवाटे (कोल्हापूर)
७. विनायक पाटील (कोल्हापूर)
८. सुनील जडेजा (गोवा)
९. महेश शेटकर
१०. शर्वरी खेर (मुंबई)
११. अनुपकुमार चौधरी (पुणे)
१२. सुनील ठाकूर (पुणे)
१३. निखिल तेंडुलकर
१४. टीमोथी रॉड्रीक्स
१५. ऍड संग्राम गावडे
१६. नार्सिवा नागवेनकर
या रनचा समारोप आणि बक्षीस प्रदान सोहळा सावंतवाडी राजवाडा येथे सावंतवाडी संस्थानचे युवराज लाखांराजे भोसले, युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोसले, नेमबाजी प्रशिक्षक कांचन उपरकर आणि जेष्ठ समाजसेवक आणि रिक्षा संघटना माजी अध्यक्ष सुधीर पराडकर यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.
मयूर कन्स्ट्रक्शन केरवडे कुडाळ, मयूर टी शिर्ट्स कट्टा (मालवण), सौ अन्नपूर्णा कोरगावकर (ऍम्ब्युलन्स सपोर्ट), डॉ वि सी काठाने, डॉ. बाबासाहेब पाटील (आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडी), डॉ शंतनू तेंडुलकर, पंकज वेंगुर्लेकर (जाहिरात आणि मीडिया पार्टनर अँड सपोर्ट), रामा गावडे (अर्पण मेडिकल मेडिकल किट सपोर्ट), पोलीस निरीक्षक सावंतवाडी आणि बांदा पोलीस स्टेशन यांचे या रनसाठी सहकार्य होत असल्याची माहिती सिंधू रनरचे ओंकार पराडकर यांनी दिली आहे