24.6 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवण शहर एस टी बसस्थानकाची दुरावस्था मतदारांनी पहावी व परीक्षण करावे : भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे.

- Advertisement -
- Advertisement -

भाजपाच्या विरोधात बोंबाबोंब करणे इतकेच काम खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी केले असल्याची भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांची प्रसिद्धीपत्राद्वारे टीका…!

सिंधुदुर्ग : भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष व रत्नागिरी प्रभारी नवलराज काळे यांनी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सध्याच्या निवडणुक प्रचारा दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात एस टी बसने प्रवास करताना नवलराज काळे हे मालवण बसस्थानक येथे आले असता त्यांना बसस्थानकाची दुरावस्था दिसल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका हा पर्यटन तालुका म्हणून जगप्रसिद्ध आहे अनेक पर्यटक लांब दूरचे प्रवासी या मालवण तालुक्यात येत असतात. बहुतांशी पर्यटक प्रवासी व सामान्य जनता हे एसटी बस सेवेचा वापर करत असतात आणि ते थेट जर कोणी उतरायचे असेल तर ते एसटी बस डेपो वर उतरतात एसटी बस डेपो म्हणजे मालवण तालुक्याचे मुख/नाक आहे. त्याची अवस्था तर बेकार असेल तर मतदार संघामध्ये काय अवस्था असेल..? मराठी मध्ये म्हणतात ना शितावरून भाताचे परीक्षण तसेच अशा मुख्य प्रवाहात असणाऱ्या इमारतीची अवस्था बघून मतदारसंघामध्ये काय अवस्था असेल याचं परीक्षण मतदारांनी केलं पाहिजे असेही नवलराज काळे यांनी प्रसिद्धी पत्रात सांगितले आहे.

उबाठा गटाचे अकार्यक्षम १० वर्ष फुकट घालवणारे आमदार वैभव नाईक व अकार्यक्षम विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार विनायक राऊत हे गेले दहा वर्षे खासदार म्हणून या जिल्ह्यामध्ये मिरवत आहेत. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांमधील आमदार आणि खासदार दोन्हीही एकाच विचाराच्या पक्षांमध्ये कार्यरत असताना जवळपास साडे सात वर्ष सत्ताधारी पक्षाचे देखील ते आमदार होते, खासदार होते असं असताना मालवण येथील एसटी बस डेपो म्हणजे अखंड मालवणचे मुख व नाक असलेलं ठिकाण. या एसटी बस डेपो ची अवस्था जर आपण पाहिली तर नक्की इथला आमदार खासदार किती जनतेच्या प्रश्नांना गांभीर्याने घेऊन काम करतो हे दिसून येईल. एसटी डेपो च्या इमारतीचे आरसीसी पिलरचे आतील लोखंड बाहेर येऊन पूर्ण गंजून गेले अशी अवस्था या डेपोची आहे. डेपो मध्ये उभे असलेले प्रवाशी जीव मुठीत घेऊन या डेपोचा वापर करीत आहेत. एका बाजूला राणेसाहेबांनी काय केला असा प्रश्न करत आम्हीच या जिल्ह्याचा विकास केला अशा खोटा व खोडसाळ दावा करून राणे साहेब आणि भाजपाच्या विरोधात बोंबाबोंब करून आपली लोकप्रियता वाढवायची एवढेच काम या आमदार खासदारांनी केलं.एसटी बस सेवा वापर करून जे पर्यटक नवनवीन प्रवासी जर मालवण येथे जेव्हा येतील तेव्हा नक्कीच विचार करतील अकार्यक्षम आमदार खासदार या भागात आहेत म्हणून ही अशी दुरवस्था झाली आहे. जे लोकप्रतिनिधी मुख्य प्रवाहात असणाऱ्या जनतेच्या जीवनमानाचा प्रश्न असणाऱ्या आणि लोकांच्या निदर्शनात येण्यासारख्या बाबीत लक्ष घालू शकत नाही, त्याची डेव्हलपमेंट करू शकत नाही त्याच्यावरून जनतेने या मतदारसंघांमध्ये काय काम झाली असतील याचा विचार करणे गरजेचे आहे. असे दहा वर्षे फुकट घालवणारे लोकप्रतिनिधी आपण पुन्हा पुन्हा निवडून द्यायचे का याचाही पुनर्विचार कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील जनतेने केला पाहिजे असे नवलराज काळे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!