शिरगांव : जानेवारी २०२३ – २४ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ब्रेन डेव्हलपमेंट( बी डी एस) स्पर्धा परीक्षेत देवगड तालुक्यातील केंद्र शाळा साळशी नं १ या प्रशालेतून ५ विद्यार्थी बसले होते,यापैकी इयत्ता पहिली मधील राघव निलेश गावकर याने १०० पैकी ९६ गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम व देवगड तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला.तसेच त्याने ऑल इंडिया रॅंक ३७ असून या मेरिट लिस्ट मधून गोल्ड मेडल मिळवले आहे. तसेच इयत्ता पहिली मधील नैतिक केशव लब्दे (९० गुण) व इयत्ता पाचवीमधील कौस्तुभ कैलास गावकर (८१ गुण) मिळवून यांनी ऑल इंडिया रँक मेरिट लिस्ट मधून सिल्व्हर मेडल पटकावले.तसेच पारस संदीप वरेरकर ( ६७ गुण) व अद्वैत संतोष गुरव (६०गुण ) हे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
या विद्यार्थ्यांना या प्रशालेचे केंद्रमुख्याध्यापक गंगाधर कदम , पदवीधर शिक्षक संतोष मराठे, उपशिक्षिका हेमलता जाधव, वर्गशिक्षिका स्मिता कोदले यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सरपंच वैशाली सुतार, उपसरपंच कैलास गावकर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष साळसकर, उपाध्यक्ष त्रिशा गावकर, शिक्षक वर्ग, पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.