25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सिडनी हत्याकांडात ६ जण दगावले ; ९ महिन्याच्या बाळासहीत अनेकांवर हल्ला..!

- Advertisement -
- Advertisement -

एक भारतीय दांपत्य थोडक्यात बचावले ; माणुसकीला हादरवणार्या या घटनेमागे ‘दहशतवादी कट्टरपणाचे ‘ कारण असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणं..!

ब्यूरो न्यूज | आंतरराष्ट्रीय : ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात भरपूर गर्दी असलेल्या मॉलमध्ये एका व्यक्तीनं काही जणांवर चाकूहल्ला केला. यात ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. ही घटना वेस्टफील्ड मॉलमध्ये घडली आहे. पोलिसांच्या कारवाईत चाकू हल्ला करणाऱ्याला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचवेळी एक प्रत्यक्षदर्शी त्याठिकाणी जवळच्याच एका कॅफेमध्ये दोन मुलांसह उपस्थित होते. एक व्यक्ती कशाचाही विचार न करता अंधाधुंदपणे इतरांवर चाकूनं हल्ला करत असल्याचं त्यांनी पाहिलं.
“हा एखाद्या हत्याकांडासारखा प्रकार होता,” असं ऑस्ट्रेलियाच्या एबीसी न्यूजशी बोलताना एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तिने सांगितलं. श्री. देबाशीष चक्रवर्ती व सौ. सई घोषाल चक्रवर्ती हे भारतीय दांपत्य हल्लेखोराच्या कचाट्यातून सुदैवाने बचावलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकू घेतलेला तो व्यक्ती मॉलमध्ये काल १३ एप्रिलला दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी दाखल झाला होता. त्यानंतर त्यानं एकच गदारोळ घालायला सुरुवात केली. हल्लेखोरानं शॉपिंग सेंटरमध्ये सामान्य लोकांवर हल्ला का केला? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण त्यांच्या हेतूमागं ‘दहशतवादी कट्टरपणाचं’ कारण असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
मॉलमध्ये ड्युटीवर असलेल्या एका पोलिस महिलेनं त्या हल्लेखोराचा सामना केला त्यानंतर हा संपूर्ण प्रकार थांबला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी महिला पोलिस अधिकाऱ्यांकडं चाकू वळवला होता. पण त्यांनी त्याला गोळी घातली. हल्लेखोरानं किमान नऊ लोकांना चाकूनं भोसकलं असं पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. शॉपिंग मॉलमध्ये हल्लेखोरानं ज्यांच्यावर हल्ला केला आहे त्यातील जखमींमध्ये नऊ महिन्याच्या बाळाचा समावेश असल्याचंही सांगितलं जात आहे. ३३ वर्षांच्या जॉनी यांनी शॉपिंग करताना एकच गदारोळ ऐकला. पलटून पाहिल्यानंतर त्यांना एक महिला आणि तिच्या बाळावर हल्ला झाल्याचं दिसलं. “तो त्यांना चाकूनं भोसकत होता. त्याठिकाणी उभा असलेला प्रत्येक व्यक्ती धक्क्यात होता. नेमकं काय करावं हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं,” असं जॉनी म्हणाले. जखमी महिला धावत कशीतरी एका स्टोअरमध्ये घुसली आणि त्याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी लगेचच दार लावलं, असंही त्यांनी सांगितलं. इतर काही खरेदीदारांनी त्याठिकाणी असलेले कपडे आणि इतर गोष्टींनी रक्तस्त्राव होण्यापासून थांबवलं. बाळाला फार लागलं नाही पण महिला प्रचंड जखमी झाल्या होत्या आणि त्या घाबरलेल्या होत्या.

हल्लेखोर ( मृत )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकू घेतलेला तो व्यक्ती मॉलमध्ये दुपारी तीन वाजून १० मिनिटांनी दाखल झाला होता. त्यानंतर त्यानं एकच गदारोळ घालायला सुरुवात केली होती.

( फोटो सौजन्य : एबीसी न्यूज , बीबीसी)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

एक भारतीय दांपत्य थोडक्यात बचावले ; माणुसकीला हादरवणार्या या घटनेमागे 'दहशतवादी कट्टरपणाचे ' कारण असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणं..!

ब्यूरो न्यूज | आंतरराष्ट्रीय : ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात भरपूर गर्दी असलेल्या मॉलमध्ये एका व्यक्तीनं काही जणांवर चाकूहल्ला केला. यात ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. ही घटना वेस्टफील्ड मॉलमध्ये घडली आहे. पोलिसांच्या कारवाईत चाकू हल्ला करणाऱ्याला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचवेळी एक प्रत्यक्षदर्शी त्याठिकाणी जवळच्याच एका कॅफेमध्ये दोन मुलांसह उपस्थित होते. एक व्यक्ती कशाचाही विचार न करता अंधाधुंदपणे इतरांवर चाकूनं हल्ला करत असल्याचं त्यांनी पाहिलं.
"हा एखाद्या हत्याकांडासारखा प्रकार होता," असं ऑस्ट्रेलियाच्या एबीसी न्यूजशी बोलताना एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तिने सांगितलं. श्री. देबाशीष चक्रवर्ती व सौ. सई घोषाल चक्रवर्ती हे भारतीय दांपत्य हल्लेखोराच्या कचाट्यातून सुदैवाने बचावलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकू घेतलेला तो व्यक्ती मॉलमध्ये काल १३ एप्रिलला दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी दाखल झाला होता. त्यानंतर त्यानं एकच गदारोळ घालायला सुरुवात केली. हल्लेखोरानं शॉपिंग सेंटरमध्ये सामान्य लोकांवर हल्ला का केला? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण त्यांच्या हेतूमागं 'दहशतवादी कट्टरपणाचं' कारण असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
मॉलमध्ये ड्युटीवर असलेल्या एका पोलिस महिलेनं त्या हल्लेखोराचा सामना केला त्यानंतर हा संपूर्ण प्रकार थांबला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी महिला पोलिस अधिकाऱ्यांकडं चाकू वळवला होता. पण त्यांनी त्याला गोळी घातली. हल्लेखोरानं किमान नऊ लोकांना चाकूनं भोसकलं असं पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. शॉपिंग मॉलमध्ये हल्लेखोरानं ज्यांच्यावर हल्ला केला आहे त्यातील जखमींमध्ये नऊ महिन्याच्या बाळाचा समावेश असल्याचंही सांगितलं जात आहे. ३३ वर्षांच्या जॉनी यांनी शॉपिंग करताना एकच गदारोळ ऐकला. पलटून पाहिल्यानंतर त्यांना एक महिला आणि तिच्या बाळावर हल्ला झाल्याचं दिसलं. "तो त्यांना चाकूनं भोसकत होता. त्याठिकाणी उभा असलेला प्रत्येक व्यक्ती धक्क्यात होता. नेमकं काय करावं हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं," असं जॉनी म्हणाले. जखमी महिला धावत कशीतरी एका स्टोअरमध्ये घुसली आणि त्याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी लगेचच दार लावलं, असंही त्यांनी सांगितलं. इतर काही खरेदीदारांनी त्याठिकाणी असलेले कपडे आणि इतर गोष्टींनी रक्तस्त्राव होण्यापासून थांबवलं. बाळाला फार लागलं नाही पण महिला प्रचंड जखमी झाल्या होत्या आणि त्या घाबरलेल्या होत्या.

हल्लेखोर ( मृत )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकू घेतलेला तो व्यक्ती मॉलमध्ये दुपारी तीन वाजून १० मिनिटांनी दाखल झाला होता. त्यानंतर त्यानं एकच गदारोळ घालायला सुरुवात केली होती.

( फोटो सौजन्य : एबीसी न्यूज , बीबीसी)

error: Content is protected !!