मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब वरचीवाडी येथील विलास भगवान शेटवे ( वय ५७ वर्षे) यांचे ११ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ असा परिवार आहे.
सर्वांना हवेहवेसे वाटणारे एक सामाजिक व्यक्तीमत्त्व देवाघरी गेले. आम्ही पळसंब वासिय शेटवे परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत अशी प्रतिक्रिया, श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांचे सचिव आणि माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी एका शोक संदेशाद्वारे व्यक्त केली आहे.