बांदा | राकेश परब : बांदा शहरात नव्यानेच सुरू झालेल्या रागिणी डान्स अकादमीचा आज पत्रकार निलेश मोरजकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहरातील संगीत व कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
येथील विठ्ठल रखुमाई सभागृहात दर रविवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत शहरातील सर्व वयोगटातील पुरुष व महिलांना विविध नृत्य प्रकार शिकविण्यात येणार आहेत. नृत्यांगणा सायली गोसावी व उदय गोसावी हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ज्येष्ठ कलाकार संतोष तारी, रंगकर्मी सुनील पिळणकर, दशावतारी कलाकार रुपेश माने, लाडू पाटील, रागिणी गोसावी आदी उपस्थित होते.
या अकादमीचा लाभ घेऊन शहरातील युवक-युवतींनी नृत्याचे धडे घ्यावेत असे आवाहन यावेळी श्री मोरजकर यांनी केले.