मुंबई | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्यात दि. १ मार्च २०२४ ते ५ एप्रिल २०२४ या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे बेकायदा पैसे, बेकायदा दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातु इ. बाबींची जप्ती करण्यात आली.
यामध्ये ३८ कोटींची रोख रक्कम, २४.२६ कोटींची ३० लाख २ हजार ७८१ लिटर दारु, २०७.४५ कोटींचे १० लाख ५३ हजार ५४५ ग्रॅम ड्रग्ज, ५५.१० कोटींचे २ लाख ७५ हजार ८३१ ग्रॅम मौल्यवान धातू, ४२ लाखांचे ४ हजार २७२ फ्रिबीज, ७२.८५ कोटींचे इतर साहित्य अशी एकूण ३९८.२० कोटींची जप्ती करण्यात आली.