माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी दिली माहिती.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील माऊली मित्रमंडळाचे सल्लागार सी. आर. चव्हाण यांचा २९ मे रोजी असणार्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवारी २८ मे रोजी कणकवली शहरात ‘नाईट अंडर आर्म क्रिकेट’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माऊली मित्रमंडळाच्या वतीने कणकवली शहरात ही स्पर्धा संपन्न होत आहे.
माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळांचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितले की माऊली मित्रमंडळ जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. सर्वसामान्य नागरिकांनच्या प्रश्नांनाबाबत उठवलेला आवाज व त्यातून आम्हाला जनतेतून मिळालेली साथ तसेच आमचे समर्थ सहकारी कार्यकर्ते यांच्या साथीने आमचा प्रवास सुरु आहे. त्याच अनुषंगाने क्रीडा व युवकांचे चैतन्य अशा संकल्पनेतून माऊली मित्रमंडळाचे सल्लागार सी. आर. चव्हाण यांचा ५९ व्या वाढदिवसानिमीत्त कणकवली शहरात नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. माऊली मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर, वृद्धांसाठी आरोग्य शिबीर, सार्वजानिक ठिकाणीं स्वच्छता अभियान राबविले जाणार असल्याचा माऊली मित्रमंडळाचा मानस आहे.
कणकवली शहरातील १९ वर्षापुढील मुलींसाठी या क्रिकेट स्पर्धेत सहभागी व्हावे हा लेखील माऊली मित्रमंडळाचा मानस आहे. मुलींमध्ये नवंचैत्यन्य निर्माण व्हावे याचं दृष्टीकोनातून नाना विविध उपक्रम सतत चालू आहेत. जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी या क्रिकेट स्पर्धेत सहभागी घ्यावा. पुरुष आणि एकसमानता हवी. आपल्या तालुक्यांतील मुलांमधील कलागुण आहेत. ते दाखविण्याची संधी आम्हाला मिळावी. हेच ध्येय अंगाशी बाळगून आपल्या वाढदिवसानिमित्त माऊली मित्रमंडळाच्या वतीने ही क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली असल्याचे सी. आर .चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी सुभाष उबाळे, अविनाश गावडे भगवान कासले प्रभाकर कदम, प्रसाद उगवेकर लक्ष्मण महाडिक, प्रसाद पाताडे, योगेश रंगराव पवार , निलेश निखार्गे, ज्ञानदेव मोडक, संतोष चव्हाण, बाबुराव घाडीगावकर, हेमंत नाडकर्णी, विशाल रजपूत, सईद नाईक जमिल कुरैशी, नूरमहम्मद शेख़ उपस्थीत होते.