शिमगा खेळातून जमलेल्या निधीतून केली गरजू कुटुंबाला आर्थिक मदत.
मालवण | प्रतिनिधी : गावातील बाळ गोपाळांनी समाजासमोर सलग सहाव्या वर्षी गरजूंना आर्थिक मदत करत सेवेचा एक आदर्श विक्रम प्रस्थापित केला. तारकर्ली गावातील कु. रोहन नरेश कांदळगावकर , कु. यज्ञेश वंदन केरकर, कु. ईशान सदाशीव सागवेकर, कु. निनाद गणपत मोंडकर, कु. ॠषभ श्रीधर खराडे , कु. हार्दिक सतिश टिकम, कु. नैतिक धोंडी कांदळगावकर, कु. रोहित बाळकृष्ण वरक, कु. वरुण तांडेल, कु. दत्ताराज शिवाजी पाटकर, कु. आरव धोंडू कांदळगावकर, कु. मृणाल दाजी सारंग या बाळगोपाळांनी शिमगा खेळातून जमा झालेला निधी श्री. अविनाश चंद्रकांत धुरत आणि श्री. बबन लोणे या आजारपणाने त्रस्त असलेल्या कुटुंबाला मदत म्हणून दिला. त्यामुळे या कुटुंबाचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका व्हावा हा उद्देश होता.
यापुर्वी सुद्धा या बाळगोपाळांनी गावातील निराधार आणि गरजु व्यक्तींना आर्थिक मदत केली होती. या कामाची शाबासकी म्हणून त्यांना नवी मुंबई येथील साईवेद स्पोर्ट्सचे संचालक श्री. संजय तारी यांनी मोफत जर्सी उपलब्ध करून दिली होती. सौदी अरेबिया येथे वास्तव्यास असलेल्या श्री . प्रदिप तोंडवळकर यांनी ५००० रूपयांचे प्रोत्साहनात्मक बजक्षिस पळसंब णहोते. हे बाळगोपाळ गेली सहा वर्षे सातत्याने अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित असल्याने सध्या तारकयर्ली पंचक्रोशीत त्यांची प्रशंसा होत आहे. .