सिंधुदुर्ग | सुयोग पंडित : सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथे
ऐलमा पैलमा अक्षरदेवा आणि शब्दसखा गृप न्हावेली यांच्या संयुक्त विद्यमान ‘अलक्ष लागले दिवे’ या साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ एप्रिलला सकाळी १० वाजता, न्हावेली येथील सद्गुरु हाॅल ( मोर्ये सर) येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. गोमंतकीय कवी शंकर रामाणी यांच्या कवितेवर आधारित या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि लेखन गोव्यातील सुप्रसिद्ध कवयित्री डाॅ. अनुजा जोशी यांनी केली आहे. गोव्यातील सुप्रसिद्ध निवेदक श्री. गोविंद भगत यांचा या कार्यक्रमात सहभाग आहे.
रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचे आवाहन आयोजन शब्दसखा गृप, न्हावेली यांनी केले आहे.