26.8 C
Mālvan
Friday, November 15, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Sawant ASN
ADTV Dhondi Chindarkar ASN
IMG-20241113-WA0000

देवगड समुद्रात बुडाली नौका ; एक खलाशी बेपत्ता.

- Advertisement -
- Advertisement -

देवगड | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रात आज ३१ मार्चला पहाटे साडेपाच वाजल्याच्या सुमारास, श्री. तुषार पारकर यांच्या मालकीची ‘विशाखा’ ही नौका बुडाल्याची घटना घडली. नौकेवरील ८ पैकी ७ खलाश्यांना वाचविण्यात यश आले असून एक खलाशी अद्याप बेपत्ता आहे. देवगड बंदरातील तुषार दिगंबर पारकर यांच्या मालकीची विशाखा ही नौका मच्छीमारीसाठी रविवार ३१ मार्च रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास देवगड बंदरातून समुद्रात जाण्यासाठी निघाली होती. देवगड किल्ल्यासमोर १० वाव पाण्यात बोटीच्या तळातील सांध्याच्या फटीतून पाणी लागल्याने बोट बुडू लागली. बोट बुडत असल्याचे लक्षात आल्यावर तांडेल व खलाशी यांनी पाण्याचे कॅन रिकामी करून जीव वाचविण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उडी मारली. याच दरम्यान मच्छीमारीसाठी गेलेल्या अनंत नारकर यांच्या इंद्रायणी या नौकेवरील तांडेल व खलाशी यांनी बुडत असलेल्या बोटीवरील खलाशी यांना वाचविले. मात्र या बोटीवरील नितीन जयवंत कणेरकर ( वय ४३, राहणार कणेरी राजापूर ) यांच्या हातातील कॅन सुटून गेल्याने ते पाण्यात बेपत्ता झाले अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या घटनेची माहिती मालक तुषार पारकर व देवगड पोलीस यांना मिळतात स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्याने व पोलीस गस्तीनौका पंचगंगा यांच्या सहाय्याने बेपत्ता खलाश्याची शोध मोहीम दिवसभर सुरू होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत तो मिळालेला नव्हता.या दुर्घटनेत संपूर्ण बोट जाळ्यांसहित नौकेला जलसमाधी मिळाल्याने नौका मालक तुषार पारकर यांचे सुमारे २० लाखाचे नुकसान झाले आहे . पोलिसांच्या पंचगंगा या गस्तीनौकेतून पीएसआय सोलकर , तांडेल, दरवेश, शकील अहमद, एएसआय चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र मुंबरकर, यांनी शोध मोहीम राबविली. याबाबतच्या अधिक तपास देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय शिरगांवकर करत आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

देवगड | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रात आज ३१ मार्चला पहाटे साडेपाच वाजल्याच्या सुमारास, श्री. तुषार पारकर यांच्या मालकीची 'विशाखा' ही नौका बुडाल्याची घटना घडली. नौकेवरील ८ पैकी ७ खलाश्यांना वाचविण्यात यश आले असून एक खलाशी अद्याप बेपत्ता आहे. देवगड बंदरातील तुषार दिगंबर पारकर यांच्या मालकीची विशाखा ही नौका मच्छीमारीसाठी रविवार ३१ मार्च रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास देवगड बंदरातून समुद्रात जाण्यासाठी निघाली होती. देवगड किल्ल्यासमोर १० वाव पाण्यात बोटीच्या तळातील सांध्याच्या फटीतून पाणी लागल्याने बोट बुडू लागली. बोट बुडत असल्याचे लक्षात आल्यावर तांडेल व खलाशी यांनी पाण्याचे कॅन रिकामी करून जीव वाचविण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उडी मारली. याच दरम्यान मच्छीमारीसाठी गेलेल्या अनंत नारकर यांच्या इंद्रायणी या नौकेवरील तांडेल व खलाशी यांनी बुडत असलेल्या बोटीवरील खलाशी यांना वाचविले. मात्र या बोटीवरील नितीन जयवंत कणेरकर ( वय ४३, राहणार कणेरी राजापूर ) यांच्या हातातील कॅन सुटून गेल्याने ते पाण्यात बेपत्ता झाले अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या घटनेची माहिती मालक तुषार पारकर व देवगड पोलीस यांना मिळतात स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्याने व पोलीस गस्तीनौका पंचगंगा यांच्या सहाय्याने बेपत्ता खलाश्याची शोध मोहीम दिवसभर सुरू होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत तो मिळालेला नव्हता.या दुर्घटनेत संपूर्ण बोट जाळ्यांसहित नौकेला जलसमाधी मिळाल्याने नौका मालक तुषार पारकर यांचे सुमारे २० लाखाचे नुकसान झाले आहे . पोलिसांच्या पंचगंगा या गस्तीनौकेतून पीएसआय सोलकर , तांडेल, दरवेश, शकील अहमद, एएसआय चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र मुंबरकर, यांनी शोध मोहीम राबविली. याबाबतच्या अधिक तपास देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय शिरगांवकर करत आहेत.

error: Content is protected !!