मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद आरोग्य विभागामार्फत २९ मार्च २०२४ पासून मालवण शहरात डास प्रतिबंधक फवारणी व धूर (फॉगींग) फवारणी शहरात सुरु केली गेली आहे. मालवण शहरातील प्रभाग, बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये व पर्यटनस्थळी आणि इतर वर्दळीच्या ठिकाणी डास प्रतिबंधक फवारणी व धूर (फॉगींग) फवारणी केली जाणार आहे. शहरात डासांचे प्रादुर्भाव वाढले असून यामुळे डेंग्यू, मलेरिया सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता नाकरता येत नाही म्हणून मालवण शहरात्तील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक डास प्रतिबंधक फवारणी व धूर (फॉगीग) फवारणीचे नियोजन मालवण नगरपरिषद प्र. मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
नागरिकांना या डास प्रतिबंधक फवारणी व धूर (फॉगीग) फवारणीची आपल्या प्रभागात आवश्यकता असल्यास मालवण नगरपरिषदेचे स्वच्छता पर्यवेक्षक श्री. प्रणव घोरपडे ( ८६०५१७१०१०) यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली आहे.
मालवण नगरपरिषद मार्फत सुरु असलेल्या डास प्रतिबंधक फवारणी व धूर (फॉगीग) फवारणीकरिता नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्र. मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी केले आहे.