कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा व कणकवली शहारासह, ग्रामीण भागामधील वारंवार नाॅट रिचेबल होणारी बीएसएनएलची सेवा तातडीने सुस्थितीत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर राजेंद्र पेडणेकर ,संजय मालंडकर, सी आर चव्हाण, अविनाश गावडे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी कणकवली येथील बीएसएनएलच्या कार्यालयातील अभियंत्यांना भेट देऊन लेखी निवेदनाद्वारे केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली कणकवली शहर व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल भारतीय दूर संचार निगमच्या रेंज मध्ये वारंवार बिघाड होत आहे. गेले कित्येक महिने सर्वसामान्य नागरिक बीएसएनएलचे नेटवर्क ये-जा करत असल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस बीएसएनएल नेटवर्क नॉट रिचेबल होत चाललं आहे. अजूनही ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिक असो वा शहरातील नागरिक, प्रत्येक नागरिकांवर बीएसएनएल कंपनीवर विश्वास असल्याने मोठ्या संख्येने जिल्ह्यात बीएसएनएल कंपनीला पसंती देत आहेत असे नमूद करत हे निवेदन देण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी स्पष्ट केले.