23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

दुचाकी अपघातात एकजण गंभीर जखमी ; कुंभारमाठ येथील घटना.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : मालवण कुंभारमाठ येथे दुचाकी व गायीला धडकेत झालेल्या अपघातात आनंदव्हाळ येथील राजेंद्र ऊर्फ राजू भिवाजी चव्हाण (वय : ५० वर्षे) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ मालवण शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान कुंभारमाठ येथे घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू चव्हाण हे सायंकाळी कुंभारमाठ येथे सुरू असलेले क्रिकेटचे सामना पहाण्याण्यासाठी थांबले होते. त्यानंतर दुचाकीने आनंदव्हाळ येथे घरी परतत असताना रस्त्यावर अचानक गाय आडवी आल्याने त्यांच्या दुचाकीची धडक बसून ते रस्त्यावर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. अपघात झाल्याचे दिसताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तात्काळ अधिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांची तब्येत चिंताजनक झाल्याने त्यांना गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात जात अपघाताबद्दल माहिती घेतली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : मालवण कुंभारमाठ येथे दुचाकी व गायीला धडकेत झालेल्या अपघातात आनंदव्हाळ येथील राजेंद्र ऊर्फ राजू भिवाजी चव्हाण (वय : ५० वर्षे) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ मालवण शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान कुंभारमाठ येथे घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू चव्हाण हे सायंकाळी कुंभारमाठ येथे सुरू असलेले क्रिकेटचे सामना पहाण्याण्यासाठी थांबले होते. त्यानंतर दुचाकीने आनंदव्हाळ येथे घरी परतत असताना रस्त्यावर अचानक गाय आडवी आल्याने त्यांच्या दुचाकीची धडक बसून ते रस्त्यावर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. अपघात झाल्याचे दिसताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तात्काळ अधिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांची तब्येत चिंताजनक झाल्याने त्यांना गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात जात अपघाताबद्दल माहिती घेतली.

error: Content is protected !!