ओरोस | प्रतिनिधी : विधानसभा विशेष हक्क समिती प्रमुख तसेच आमदार दीपक केसरकर हे दि. 31 ऑक्टोबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. रविवार दि. 31 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 ते 1.30 सावंतवाडी निवासस्थान येथे राखीव. दुपारी 1.30 वा. वेंगुर्लाकडे प्रयाण, दुपारी 2.00 वा. आडेली भडवाडी प्राथमिक शाळा येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आडेली भडवाडी शंभूभवानी रस्त्याचे भूमिपूजन. दुपारी 3.00 वा. वायंगणी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर खानोली कोंडुरा येरमलिंगाचे देवालय रस्त्याचे भूमिपूजन. दुपारी 4.00 वा. कोचरा उंबराचे पाणी प्राथमिक शाळेजवळ मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर कोचरा ते उंबराचे पाणी रस्त्याचे भूमिपूजन. सायंकाळी 5.00 वा. येसू आका महिला काथ्या प्रक्रिया संस्था, सिंधुदुर्ग विमानतळ जवळ, परुळे येथे, चांदा ते बांदा योजनेंतर्गत परुळे, ता. वेंगुर्ला येथे महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळामार्फत उभारण्यात आलेल्या काथ्या उद्यागाचे सामुहिक सुविधा केंद्राचे उद्घाटन. सोयीनुसार सावंतवाडी निवास्थानकडे प्रयाण, सोयीनुसार सावंतवाडी निवासस्थान येथे आगमन व राखीव.