26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची घेतली कुडाळात भेट..!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची २० मार्चला कुडाळ येथे भेट घेत एक दीर्घ लेखी निवेदन दिले. या निवेदनामध्ये माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी मालवण नगरपरिषदेच्या प्रशासकीय कारभाराबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार केली असून त्याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या स्तरावर आवश्यक ती माहिती घेऊन त्यानुसार कार्यवाही करावी असे निवेदन दिले आहे.

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक ही जबाबदारी एकाच व्यक्तिकडे असल्याने मालवण शहरातील विकासाचे, कचरा व्यवस्थापन व स्ट्रीट लाईट सारख्या घटकांकडे गेल्या वर्षभरात अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. स्वच्छतेविषयी नियोजनाचा अभाव, वापराविना असलेले बायोटाॅयलेटस, सक्शन गाडीचे अयोग्य नियोजन व बंद झालेली डास फवारणी, पार्किंग व्यवस्था, चुकीच्या पद्धतीने लागलेल्या दिशादर्शक फलकांमुळे पर्यटनाला बसणारा फटका, फोवकांडा पिंपळ येथील फाऊंटनची दुरावस्था, भाजी मार्केट व मामा वरेरकर नाट्यगृह येथील मल्टीपर्पज हाॅलचे थांबलेले काम तसेच अग्निशमन इमारत व मालवण न प आवार येथील संथ गतीने होत असलेले सुशोभिकरणाचे काम, मच्छि मार्केट येथील गाळ्यांची न झालेली लिलाव प्रक्रिया असे मुद्दे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समोर तक्रार स्वरुपात ठेवले असून यापूर्वी याबाबात मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्याकडे वारंवार याबाबत पाठपुरावा केला असूनही त्याबाबत ठोस समाधान होत नसल्याचे नमूद केले आहे. या सर्व परिस्थिती मुळे मालवण नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगत निधी उपलब्ध करुन देऊनही जर काम होत नसेल तर विकासाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासल्यासारखे होत असल्याची खंत महेश कांदळगांवकर यांनी व्यक्त केला आहे.

मालवण नगरपरिषदेतील माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व सहकारी लोकप्रतिनिधी यांचा कार्यकाल संपल्यानंतर विकास कामांना ब्रेक लागल्याचे सांगत नगरपरिषदेच्या निवडणुका न झाल्याने जनता आजही, विविध कामांसाठी माजी लोकप्रतिनिधींकडूनच अपेक्षा करणार आणि ती आपली नैतिक जबाबदारी आहे महेश कांदळगांवकर यांनी नमूद केले आहे. परंतु कामे न झाल्यास सुद्वा माजी लोकप्रतिनिधीनींनाच जबाबदार धरणार असल्याचे सांगत महेश कांदळगांवकर यांनी प्रशासनाकडे सर्व मुद्द्यांबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला असूनही कार्यवाही न झाल्याची तक्रार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची कुडाळ येथे भेट घेतली त्यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा बॅन्क उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी आमदार राजन तेली, मालवण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक गणेश कुशे उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!