27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

उद्योजक श्री. राजन आंगणे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री राजन आंगणे यांच्या पार्थिवावर आज १९ मार्चला मालवण मधील दांडी स्मशानभूमी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. श्री राजन आंगणे ( वय : ५९ वर्षे ) यांचे काल१८ मार्चला अकाली निधन झाल्याचे वृत्त समजताच विविध स्तरांतून शोक व्यक्त होत आहे. आज सकाळी मालवण वायरी येथील श्री कलावती मंदिर नजिक त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी अडिच वाजता दांडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत श्री. राजन आंगणे यांचे ज्येष्ठ बंधू श्री आनंद आंगणे यांनी पार्थिवाला विधीवत मुखाग्नी दिला. यावेळी आंगणे कुटुंबिय मंडळाचे अध्यक्ष श्री भास्कर आंगणे, मधुकर आंगणे, सीताराम आंगणे, विनय आंगणे, नंदू आंगणे, सतिश आंगणे, अर्जुन आंगणे, बाबू आंगणे, समीर आंगणे, सुधा आंगणे, प्रसाद आंगणे व आंगणे कुटुंबीयांसह विविध स्तरांतील प्रतिष्ठीत व्यक्ती, उद्योजक, व्यापारी तसेच सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील आजी – माजी लोकप्रतिनिधी, मित्रपरिवार आणि जिल्हावासिय, मालवणवासिय व मसुरे ग्रामस्थ उपस्थित होते. तत्पूर्वी आमदार वैभव नाईक, युवानेते संदेश पारकर, ज्येष्ठ नेते प्रभाकर सावंत, उद्योजक दत्ता सामंत व इतर राजकीय मान्यवर व उद्योजक यांनी राजन आंगणे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

दिवंगत श्री राजन आंगणे यांच्या शोकसभेत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरचे माजी आमदार विनय नातू, पिंपर गांवचे माजी सरपंच मोरे, श्री. मधुकर आंगणे, नयन महाजन, रविकिरण तोरसकर यांनी राजन आंगणे यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि श्रद्धांजली वाहिली. राजन आंगणे यांच्या अचानक जाण्याने प्रचंड पोकळी निर्माण झाल्याची आंगणे कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली तर नेहमी सर्वांना उद्योजकतेसाठी व माणुस म्हणून ताठ मानेने जगण्यासाठी प्रेरणा देणारे योगी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना उपस्थित मित्रपरिवाराने व्यक्त केली.

यावेळी मालवण दांडी येथील स्मशानभूमीत कै. राजन आंगणे यांचे ज्येष्ठ बंधू श्री आनंद आंगणे, पुतण्या अमेय आंगणे, आंगणे कुटुंबीय मंडळ अध्यक्ष भास्कर आंगणे, विनय आंगणे, नंदू आंगणे व आंगणे कुटुंबीय तसेच माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, मालवण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, मच्छिमार नेते व माजी जि प सदस्य हरी खोबरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, सामाजिक कार्यकर्ते विजय चव्हाण, शेखर गाढ, उमेश मांजरेकर, छोटू सावजी, सूर्यकांत फणसेकर, किशोर खानोलकर, चेतन वाळके, नितीन खानोलकर, मनोज मोंडकर, मंदार ओरसकर, मयूर पारकर, राजेश कुडाळकर, परशुराम पाटकर, मयू पाटकर, रविकिरण तोरसकर, अजय पोयेकर, मसुरे येथील ज्येष्ठ पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर व अन्य मान्यवर तसेच अनेक मालवणवासिय, उद्योजक आणि राजन आंगणे यांचे निकटवर्तीय व मित्रपरिवार उपस्थित होते. शोकसभेनंतर उपस्थित सर्वांनी २ मिनिटे स्तब्धता पाळून श्री. राजन आंगणे यांना श्रद्धांजली वाहिली.

मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे २७ मार्चला कै. राजन आंगणे यांचे दशक्रीया विधी संपन्न होतील अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने यावेळी देण्यात आली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री राजन आंगणे यांच्या पार्थिवावर आज १९ मार्चला मालवण मधील दांडी स्मशानभूमी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. श्री राजन आंगणे ( वय : ५९ वर्षे ) यांचे काल१८ मार्चला अकाली निधन झाल्याचे वृत्त समजताच विविध स्तरांतून शोक व्यक्त होत आहे. आज सकाळी मालवण वायरी येथील श्री कलावती मंदिर नजिक त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी अडिच वाजता दांडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत श्री. राजन आंगणे यांचे ज्येष्ठ बंधू श्री आनंद आंगणे यांनी पार्थिवाला विधीवत मुखाग्नी दिला. यावेळी आंगणे कुटुंबिय मंडळाचे अध्यक्ष श्री भास्कर आंगणे, मधुकर आंगणे, सीताराम आंगणे, विनय आंगणे, नंदू आंगणे, सतिश आंगणे, अर्जुन आंगणे, बाबू आंगणे, समीर आंगणे, सुधा आंगणे, प्रसाद आंगणे व आंगणे कुटुंबीयांसह विविध स्तरांतील प्रतिष्ठीत व्यक्ती, उद्योजक, व्यापारी तसेच सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील आजी - माजी लोकप्रतिनिधी, मित्रपरिवार आणि जिल्हावासिय, मालवणवासिय व मसुरे ग्रामस्थ उपस्थित होते. तत्पूर्वी आमदार वैभव नाईक, युवानेते संदेश पारकर, ज्येष्ठ नेते प्रभाकर सावंत, उद्योजक दत्ता सामंत व इतर राजकीय मान्यवर व उद्योजक यांनी राजन आंगणे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

दिवंगत श्री राजन आंगणे यांच्या शोकसभेत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरचे माजी आमदार विनय नातू, पिंपर गांवचे माजी सरपंच मोरे, श्री. मधुकर आंगणे, नयन महाजन, रविकिरण तोरसकर यांनी राजन आंगणे यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि श्रद्धांजली वाहिली. राजन आंगणे यांच्या अचानक जाण्याने प्रचंड पोकळी निर्माण झाल्याची आंगणे कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली तर नेहमी सर्वांना उद्योजकतेसाठी व माणुस म्हणून ताठ मानेने जगण्यासाठी प्रेरणा देणारे योगी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना उपस्थित मित्रपरिवाराने व्यक्त केली.

यावेळी मालवण दांडी येथील स्मशानभूमीत कै. राजन आंगणे यांचे ज्येष्ठ बंधू श्री आनंद आंगणे, पुतण्या अमेय आंगणे, आंगणे कुटुंबीय मंडळ अध्यक्ष भास्कर आंगणे, विनय आंगणे, नंदू आंगणे व आंगणे कुटुंबीय तसेच माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, मालवण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, मच्छिमार नेते व माजी जि प सदस्य हरी खोबरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, सामाजिक कार्यकर्ते विजय चव्हाण, शेखर गाढ, उमेश मांजरेकर, छोटू सावजी, सूर्यकांत फणसेकर, किशोर खानोलकर, चेतन वाळके, नितीन खानोलकर, मनोज मोंडकर, मंदार ओरसकर, मयूर पारकर, राजेश कुडाळकर, परशुराम पाटकर, मयू पाटकर, रविकिरण तोरसकर, अजय पोयेकर, मसुरे येथील ज्येष्ठ पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर व अन्य मान्यवर तसेच अनेक मालवणवासिय, उद्योजक आणि राजन आंगणे यांचे निकटवर्तीय व मित्रपरिवार उपस्थित होते. शोकसभेनंतर उपस्थित सर्वांनी २ मिनिटे स्तब्धता पाळून श्री. राजन आंगणे यांना श्रद्धांजली वाहिली.

मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे २७ मार्चला कै. राजन आंगणे यांचे दशक्रीया विधी संपन्न होतील अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने यावेळी देण्यात आली.

error: Content is protected !!