24.4 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवण स्पोर्टस् क्लब आयोजीत एम पि एल लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेचे ज्येष्ठ क्रिकेटपटू जयंत गवंडे यांच्या हस्ते उद्घाटन ; स्पर्धेचे ७ वे पर्व.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित मालवण प्रीमिअर लीग २०२४ या लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ लेदरबाॅल क्रिकेटपटू व क्रिकेट संघटक श्री. जयंत गवंडे यांच्या हस्ते १७ मार्चला संपन्न झाले. टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राऊंडवर शुभारंभ झालेल्या या स्पर्धेचे यंदा ७ वे पर्व आहे.

ही स्पर्धा रविवार दि. १७ मार्च ते रविवार दि. २४ मार्च या कालावधीत मालवण बोर्डिंग मैदानावर चालणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रक्कम ५५,५५५/- व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला रोख रक्कम ३३,३३३/- व आकर्षक चषक तसेच अष्टपैलू खेळाडू, अष्टपैलू गोलंदाज, अष्टपैलू फलंदाज देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्याची नाणेफेक मालवण स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष श्री. सौरभ ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आली.

मालवण प्रीमिअर लीगच्या उदघाटन प्रसंगी मालवण स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सौरभ ताम्हणकर, उपाध्यक्ष गौरव लुडबे, नितीन कानसे, फ्रँसिस फेर्नांडिस, सुशील शेडगे, ज्ञानेश केळूसकर, नितीन वाळके, संदीप पेडणेकर, ज़ुबेर खान, अनिल चव्हाण, राहुल परुळेकर, लौकिक कांदळकर, रुपेश केळूसकर, वैभव सावंत, अण्णा कारेकर, लारा मयेकर, रोहित चव्हाण, प्रथमेश लुडबे मालवण स्पोर्ट्स क्लबचे अन्य पदाधिकारी व सदस्य तसेच खेळाडू, स्पर्धा पंच उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित मालवण प्रीमिअर लीग २०२४ या लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ लेदरबाॅल क्रिकेटपटू व क्रिकेट संघटक श्री. जयंत गवंडे यांच्या हस्ते १७ मार्चला संपन्न झाले. टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राऊंडवर शुभारंभ झालेल्या या स्पर्धेचे यंदा ७ वे पर्व आहे.

ही स्पर्धा रविवार दि. १७ मार्च ते रविवार दि. २४ मार्च या कालावधीत मालवण बोर्डिंग मैदानावर चालणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रक्कम ५५,५५५/- व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला रोख रक्कम ३३,३३३/- व आकर्षक चषक तसेच अष्टपैलू खेळाडू, अष्टपैलू गोलंदाज, अष्टपैलू फलंदाज देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्याची नाणेफेक मालवण स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष श्री. सौरभ ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आली.

मालवण प्रीमिअर लीगच्या उदघाटन प्रसंगी मालवण स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सौरभ ताम्हणकर, उपाध्यक्ष गौरव लुडबे, नितीन कानसे, फ्रँसिस फेर्नांडिस, सुशील शेडगे, ज्ञानेश केळूसकर, नितीन वाळके, संदीप पेडणेकर, ज़ुबेर खान, अनिल चव्हाण, राहुल परुळेकर, लौकिक कांदळकर, रुपेश केळूसकर, वैभव सावंत, अण्णा कारेकर, लारा मयेकर, रोहित चव्हाण, प्रथमेश लुडबे मालवण स्पोर्ट्स क्लबचे अन्य पदाधिकारी व सदस्य तसेच खेळाडू, स्पर्धा पंच उपस्थित होते.

error: Content is protected !!