पक्ष निरीक्षक गजानन राणे, संदीप दळवी, मनविसे राज्य प्रमुख संघटक यश सरदेसाई, जिल्हा अध्यक्ष धीरज परब, महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस, जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर, अनिल केसरकर यांची प्रमुख उपस्थिती.
मनसेचे माजी पदाधिकारी तथा ज्येष्ठ मनसैनिक अमित इभ्रामपूरकर, दया मेस्त्री, विल्सन गीरकर, विशाल ओटवणेकर यांच्यासह मनसैनिक, मनविसे व महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या भरड नाका नजिक, हाॅटेल प्राईडच्या बाजुला मनसेच्या नूतन शाखेचा शुभारंभ आज १४ मार्चला संपन्न झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वीत झालेल्या या शाखेचे उद्घाटन पक्षनिरीक्षक श्री गजानन राणे व श्री संदीप दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत मनविसे राज्य प्रमुख संघटक यश सरदेसाई यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. मनसे महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस यांच्या माध्यमातून या शाखेचा शुभारंभ झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध स्वराज्य ढोलपथकाच्या गजरात व फटाक्याच्या आतषबाजीसह, असंख्य ज्येष्ठ व युवा मनसैनिकांच्या उपस्थितीत हा शानदार शुभारंभ सोहळा संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.





या कार्यक्रमाला जिल्हा पक्ष निरीक्षक गजानन राणे, संदीप दळवी तसेच मनविसे राज्य प्रमुख संघटक यश सरदेसाई, जिल्हा अध्यक्ष धीरज परब, महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस, जिल्हा सचिव बाळा पावसकर, अनिल केसरकर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, मनसे माजी पदाधिकारी अमित इभ्रामपूरकर, दया मेस्त्री, विशाल ओटवणेकर, गुरु तोडणकर, विल्सन गीरकर, आबा आडकर तसेच माळगांव शाखा अध्यक्ष हर्षद पाटकर , देवगड तालुकाध्यक्ष संतोष मयेकर, देवगड तालुका महिला उपाध्यक्ष स्वाती सावंत, श्रीमती रश्मी दाभोलकर, सौ. सायली मांजरेकर, सूरज माजरेकर, अक्षय जोशी, ज्येष्ठ व युवा मनसैनिक, मनविसे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मनसे महिला कार्यकर्त्या उपस्थित उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार संपन्न झाला.







या उद्घाटन प्रसंगी बोलताना मनसे पक्ष निरीक्षक गजानन राणे यांनी नूतन शाखेला व मनसैनिकांना शुभेच्छा देताना म्हणले की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वीत झालेल्या या शाखेतून आता समाजासाठी आवश्यक कार्यक्रम जिल्हा अध्यक्ष धीरज परब, महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर, मालवण मनसेचे अमित इभ्रामपूरकर, विल्सन गीरकर, विशाल ओटवणेकर, मनसैनिक आणि मनविसे यांच्या मार्फत अधिक जोमाने राबविले जातील. पक्षनिरीक्षक संदीप दळवी यांनी उपस्थित मनसैनिकांना मार्गदर्शन करताना पर्यटन व पर्यावरण या घटकांवर काम करायचे आवाहन केले. मनविसे राज्य प्रमुख संघटक यश सरदेसाई यांनी त्यांच्या मनोगतामध्ये उपस्थित सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.