विजेत्या सौ. असमी पवार ठरल्या आकर्षक पैठणीच्या मानकरी तर द्वितीय विजेत्या दीपिका जगताप यांना सीलिंग फॅन आणि तृतीय विजेती सौ. आकांक्षा लाड यांना ज्वेलरी सेट…!
‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते निलेश पवार यांनी ‘होम मिनिस्टर अर्थात् खेळ रंगणार पैठणीचा” खेळात आणली विशेष रंगत.
शिरगांव | संतोष साळसकर : जागतिक महिला दिन २०२४ च्या निमित्ताने कणकवली तालुक्यातील भरणी येथील जागृत महिला ग्रामसंघ, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ११ मार्च रोजी येथील प्राथमिक शाळेच्या सभागृहात ‘जागर स्त्री शक्तीचा’ हा विशेष सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे उदघाटन नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती देसाई यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी गावातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यात पोस्टमास्टर सौ. मनीषा राणे, सहाय्यक शिक्षिका सौ. आराधना राजन रासम, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. वैशाली भिवा वर्देकर, कृषीसहायीका सौ. विशाखा रावराणे, ग्रामसेविका वर्षा जाधव, उमेद अभियानच्या सौ. अमृता चव्हाण, कणकवली कॉलेज शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या संचालिका सौ. प्रतीक्षा गणेश तांबे, ग्रामपंचायत कर्मचारी सौ. अश्विनी अशोक राऊळ, अंगणवाडी सेविका सौ. शितल भिकाजी गुरव, सौ. शिल्पा शशिकांत घाडी, श्रीमती वनिता विश्राम राऊळ, अंगणवाडी मदतनीस श्रीमती आनंदी अनंत लाड, श्रीमती दीपिका दशरथ जगताप, आशा स्वयंसेविका सौ. संजीवनी संतोष गुरव, पोषण आहार स्वयंपाकी सौ. संगीता सखाराम चिंचवलकर, सौ. वैशाली विलास जगताप आदी महिलांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती देसाई , गावातील यशस्वी उद्योजिका सौ. अपर्णा घाडी, मराठी अभिनेते निलेश पवार आदी मान्यवरांचा यावेळी शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यातील ‘होममिनिस्टर अर्थात खेळ रंगणार पैठणीचा’ हा कार्यक्रम प्रमुख आकर्षण ठरला.
या कार्यक्रमात ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील अभिनेते आणि निवेदक निलेश पवार यांच्या निवेदनाने खेळात रंगात आली. या पैठणीच्या खेळात गावातील अनेक महिलांनी सहभाग घेतला. यावेळी महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. अगदी वयोवृध्द महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
या खेळात प्रथम विजेत्या म्हणून सौ. असमी अशोक पवार यांना अभिनेते निलेश पवार यांच्या हस्ते आकर्षक पैठणी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तर द्वितीय विजेत्या श्रीमती दीपिका दशरथ जगताप यांना सीलिंग फॅन, तृतीय विजेत्या सौ. आकांक्षा अजय लाड यांना ज्वेलरी सेट प्रदान करण्यात आला. मुंबईच्या यशस्वी उद्योजिका सौ. राजश्री हेमंत पवार यांच्याकडून पैठणीची साडी तर कोकण डिस्ट्रीब्युटरचे विजय घाडी यांनी सन्मानचिन्ह पुरस्कृत केले होते.
या सोहळ्यात सकाळच्या पहिल्या सत्रात मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात संगीत खुर्ची मध्ये लहान गटात प्रथम – विनय लाड, द्वितीय – हर्षाली वायंगणकर, मध्यम गटात – प्रथम – शार्दुल माने, द्वितीय – सार्थक घाडीगावकर, मोठा गट – प्रथम – वृषभ घाडीगावकर, द्वितीय – हर्षिता दळवी, मध्यम गट – प्रथम – सार्थक साटम, मोठा गट – प्रथम – रिया गुरव, द्वितीय – वेदिका पवार यांनी बाजी मारली. या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती देसाई, “रात्रीस खेळ चाले” या मालिकेचे अभिनेते निलेश पवार, जागृत महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ. साक्षी लाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश बागवे, उपाध्यक्ष महेश परब, मुख्याध्यापक लक्ष्मण राणे, माजी उपसरपंच प्रकाश घाडी, सुरेखा डेकोरेटर चे संजय उर्फ बाळा लाड, माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. वैशाली वर्देकर, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण राठोड, कृषी सहायिका विशाखा रावराणे, ग्रामसेविका वर्षा जाधव, पोष्ट मास्टर सौ. मनीषा राणे, कणकवली महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या संचालिका सौ. प्रतीक्षा तांबे, उद्योजिका सौ. अपर्णा घाडी, उमेदच्या सौ. अमृता चव्हाण, शिक्षक राजन रासम, लक्ष्मण ढवण, ग्रामसंघाच्या सी आर पी श्रीमती दिपाली साळसकर, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती लक्ष्मी जगताप, सौ. आराधना रासम, तसेच बचत गटांचे सर्व गटप्रमुख आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना सौ. सायली पालकर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री नारी शक्तीचे महत्त्व सांगितले. तसेच मान्यवरांनी आपली मनोगते मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन रासम यांनी तर आभार मुख्याध्यापक लक्ष्मण राणे यांनी मानले. यावेळी गावातील बहुसंख्य महिला, वयोवृध्द महिला आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी जागर स्त्री शक्तीचा या सोहळ्याच्या आयोजनाची आणि त्यातील होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगणार पैठणीचा या कार्यक्रमाची प्रशंसा केली.