24.6 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सतीश मुणगेकर राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : ‘नवी दिशा नवे उपक्रम’ या राज्यस्तरीय समूहातर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा व राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक सोहळा राजीव गांधी ई – लर्निंग स्कूल पुणे येथे पार पडला. या सोहळ्यामध्ये एकशे तीन उपक्रमशील शिक्षकांना गौरविण्यात आले. तसेच त्यांनी सादर केलेल्या विविध नवोपक्रमांच्या ‘शतक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले.यावेळी गुहागर तालुक्यातील जि. प. पू .प्राथ. आदर्श केंद्र शाळा चिखली नं.१ शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. सतिश पांडुरंग मुणगेकर यांनाउपसंचालक SCERT पुणे डॉ. शोभा खंदारे यांच्या हस्ते राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुणगेकर यांचा ‘खेळातून शिक्षण’ हा उपक्रम या पुस्तकात समाविष्ट आहे.

या कार्यक्रमास उपशासकीय अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे मनपाश्रीम. शुभांगी चव्हाण- या अध्यक्षस्थानी होत्या.तर माजी उपमहापौर महानगरपालिका पुणे आबा बागूल हे प्रमुख पाहुणे होते. तसेच SCERTचे अध्यक्ष राहुल रेखावार, उपसंचालक मा. डॉ .शोभा खंदारे आणि श्री. माणिक देवकर क्रीडा विभाग प्रमुख शिक्षण विभाग पुणे मनपा हे उपस्थित होते. ‌संपादक श्री. देवराव चव्हाण, श्री.बळीराम जाधव आणि श्री‌.आयुब शेख यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. पुरस्काराबद्दल सतीश मुणगेकर यांचे अभिनंदन होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : 'नवी दिशा नवे उपक्रम' या राज्यस्तरीय समूहातर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा व राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक सोहळा राजीव गांधी ई - लर्निंग स्कूल पुणे येथे पार पडला. या सोहळ्यामध्ये एकशे तीन उपक्रमशील शिक्षकांना गौरविण्यात आले. तसेच त्यांनी सादर केलेल्या विविध नवोपक्रमांच्या 'शतक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे' या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले.यावेळी गुहागर तालुक्यातील जि. प. पू .प्राथ. आदर्श केंद्र शाळा चिखली नं.१ शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. सतिश पांडुरंग मुणगेकर यांनाउपसंचालक SCERT पुणे डॉ. शोभा खंदारे यांच्या हस्ते राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुणगेकर यांचा 'खेळातून शिक्षण' हा उपक्रम या पुस्तकात समाविष्ट आहे.

या कार्यक्रमास उपशासकीय अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे मनपाश्रीम. शुभांगी चव्हाण- या अध्यक्षस्थानी होत्या.तर माजी उपमहापौर महानगरपालिका पुणे आबा बागूल हे प्रमुख पाहुणे होते. तसेच SCERTचे अध्यक्ष राहुल रेखावार, उपसंचालक मा. डॉ .शोभा खंदारे आणि श्री. माणिक देवकर क्रीडा विभाग प्रमुख शिक्षण विभाग पुणे मनपा हे उपस्थित होते. ‌संपादक श्री. देवराव चव्हाण, श्री.बळीराम जाधव आणि श्री‌.आयुब शेख यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. पुरस्काराबद्दल सतीश मुणगेकर यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!