विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शालेय मुलांना शालोपयोगी साहित्याचे व कर्मचारी वृंदाला भेटवस्तूंचे वाटप.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आंबेरी गांवातील श्री देव जैन सकलेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रोत्सव २०२४ अंतर्गत, ८ मार्चला विविध कार्यक्रम संपन्न झाले. सकाळी श्री गणपती पूजन व लघुरुद्राने महाशिवरात्रोत्सवाचा प्रारंभ झाला. या नंतर श्री जैन सकलेश्वर देवाची पूजा, ग्रामस्थ भाविकांच्या एकादशणी अभिषेक, आरती, दुपारी वाजता वरद शंकर पूजा असे धार्मिक विधी संपन्न झाले. त्यानंतर श्री अक्षय परब ( मुंबईस्थित ग्रामस्थ ) यांच्या वतीने शालेय मुलांसाठी शालोपयोगी साहित्याचे आणि आंबेरी ग्रामपंचायत उपसरपंच श्री रवींद्र उर्फ रवी परब यांच्यावतीने शालेय कर्मचारी वर्गाला भेट वस्तूंचे वितरण संपन्न झाले. संध्याकाळी ५ वाजता सुस्वर भजने सादर झाली. रात्री वाजता श्री बाळा सावंत दशावतार नाट्यमंडळ नेरूर, असरोंडी यांचा अमृतगंगा हा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर केला गेला. सर्व विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनेकांनी लाभ घेतला.
शालोपयोगी साहित्य व भेटवस्तू वितरण कार्यक्रमामध्ये सरपंच मनमोहन डिचोलकर, उपसरपंच रवींद्र परब, ग्रा. पं सदस्य सौ. पूर्वा मुसळे, भरत परब ,विराज परब, संजय परब, विलास परब, भगवान परब, अशोक परब , जि प शाळा आंबेरी क्र. १ चे मुख्याध्यापक श्री. धानजी चव्हाण , पं. स. माजी सदस्य सौ. श्रद्धा केळुस्कर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. कल्याणी परब, आंबेरी ग्रामस्थ, श्री देव जैन सकलेश्वर मंदिरचे स्थानिक व मुंबई स्थित भाविक भक्त व जि प शाळा आंबेरी क्र १ चे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
या संपूर्ण महाशिवरात्रोत्सव २०२४ सोहळ्यासाठी सहकार्य केलेल्या आणि योगदान दिलेल्या सर्वांचे तसेच उपस्थित भाविक भक्तांचे श्री देव जैन सकलेश्वर मंदिर आंबेरी ग्रामस्थांच्या वतीने आंबेरी ग्रामपंचायत सरपंच मनमोहन डिचोलकर व उप सरपंच रवींद्र परब यांनी आभार मानले आहेत.