24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

केंद्रशाळा, कट्टा येथे मराठी राजभाषा गौरव दिन संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : बॅ नाथ पै सेवांगण शाखा कट्टा, बॅ नाथ पै वाचन मंदिर कट्टा व केंद्रशाळा कट्टा नं १ यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रशाळा कट्टा येथे विविध कार्यक्रमांद्वारे मराठी भाषा गौरव दिन संपन्न झाला. या अंतर्गत मराठी हस्ताक्षर स्पर्धेत ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ५० विद्यार्थ्यांनी हस्तकलेच्या वस्तू बनवल्या. विविध पुस्तकांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. कट्टा नंबर १ च्या विद्यार्थिनीनी ‘बोलतो मराठी’ या गाण्यावर नृत्य सादर
केले व छोटी नाटिका सादर केली तर विद्यार्थ्यांनी छोट्या कथा व कविता सादर केल्या. शाळेच्या सहशिक्षीका संपदा भाट यानी या दिनाचे महत्व विद्यार्थ्याना समजावून सांगितले. दीपक गोगटे यांनी मराठी भाषा विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी हस्ताक्षर व हस्तकला स्पर्धेतील विद्यार्थ्याना पुस्तक व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
स्पर्धेचा निकाल : हस्ताक्षर १ ली प्रथम- पूजा रावले,
द्वितीय- पावनी सावंत, तृतीय आराध्या ढोलम.
हस्ताक्षर : दुसरी इयत्ता प्रथम वेदीका हुले, द्वितीय मिथील गुराम,
तृतीय साहील रजपूत. हस्ताक्षर ३री इयत्ता- प्रथम हर्षिल मालवदे, द्वितीय रुद्र पोटफोडे, तृतीय दुर्वा चिरमुले. हस्ताक्षर ४थी इयत्ता प्रथम सिध्दी गुराम, द्वितीय वेदिका भोजणे, तृतीय कुंजन फाटक.
हस्तकला १ली – विजेता पावनी सावंत, उपविजेता जय ढोलम.
हस्तकला २ री- विजेता रेवा साळोखे, साहील रजपूत. हस्तकला ३री- विजेता मिताली वारंग, उपविजेता वेदा जाधव. हस्तकला ४थी-
विजेता श्लोक चांदरकर, उपविजेता तनुश्री वालावलकर.
मुख्याध्यापक श्री ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला बॅ नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, विश्वस्त विकास म्हाडगुत, दीपक भोगटे, कार्यकारिणी सदस्या वीणा म्हाडगुत, कट्टा कार्यकारिणी सदस्य बापू तळावडेकर,
समीर चांदरकर, ग्रंथपाल सुजाता पावसकर, श्रीधर गौधळी, संतोष गिरकर, मुख्या. ठाकूर, संपदा भाट, शिवण क्लासच्या विद्यार्थिनी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : बॅ नाथ पै सेवांगण शाखा कट्टा, बॅ नाथ पै वाचन मंदिर कट्टा व केंद्रशाळा कट्टा नं १ यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रशाळा कट्टा येथे विविध कार्यक्रमांद्वारे मराठी भाषा गौरव दिन संपन्न झाला. या अंतर्गत मराठी हस्ताक्षर स्पर्धेत ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ५० विद्यार्थ्यांनी हस्तकलेच्या वस्तू बनवल्या. विविध पुस्तकांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. कट्टा नंबर १ च्या विद्यार्थिनीनी 'बोलतो मराठी' या गाण्यावर नृत्य सादर
केले व छोटी नाटिका सादर केली तर विद्यार्थ्यांनी छोट्या कथा व कविता सादर केल्या. शाळेच्या सहशिक्षीका संपदा भाट यानी या दिनाचे महत्व विद्यार्थ्याना समजावून सांगितले. दीपक गोगटे यांनी मराठी भाषा विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी हस्ताक्षर व हस्तकला स्पर्धेतील विद्यार्थ्याना पुस्तक व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
स्पर्धेचा निकाल : हस्ताक्षर १ ली प्रथम- पूजा रावले,
द्वितीय- पावनी सावंत, तृतीय आराध्या ढोलम.
हस्ताक्षर : दुसरी इयत्ता प्रथम वेदीका हुले, द्वितीय मिथील गुराम,
तृतीय साहील रजपूत. हस्ताक्षर ३री इयत्ता- प्रथम हर्षिल मालवदे, द्वितीय रुद्र पोटफोडे, तृतीय दुर्वा चिरमुले. हस्ताक्षर ४थी इयत्ता प्रथम सिध्दी गुराम, द्वितीय वेदिका भोजणे, तृतीय कुंजन फाटक.
हस्तकला १ली - विजेता पावनी सावंत, उपविजेता जय ढोलम.
हस्तकला २ री- विजेता रेवा साळोखे, साहील रजपूत. हस्तकला ३री- विजेता मिताली वारंग, उपविजेता वेदा जाधव. हस्तकला ४थी-
विजेता श्लोक चांदरकर, उपविजेता तनुश्री वालावलकर.
मुख्याध्यापक श्री ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला बॅ नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, विश्वस्त विकास म्हाडगुत, दीपक भोगटे, कार्यकारिणी सदस्या वीणा म्हाडगुत, कट्टा कार्यकारिणी सदस्य बापू तळावडेकर,
समीर चांदरकर, ग्रंथपाल सुजाता पावसकर, श्रीधर गौधळी, संतोष गिरकर, मुख्या. ठाकूर, संपदा भाट, शिवण क्लासच्या विद्यार्थिनी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!