मुंबई | ब्यूरो न्यूज : देशातील व विशेष करुन विदेशातील भारतीयांना भावलेले प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी पंकज उधास यांनी अंतिम श्वास घेतला. पंकज उधास यांची कन्या नायाब उधास यांनी सोशल मिडिया द्वारे त्यांच्या मृत्यूची बातमी दिली. भारतातील एक लोकप्रीय गायक म्हणून पंकज उधास हे प्रसिद्ध होते. पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमध्ये झाला होता. १९८० ते १९९० च्या दशका ते भारतातील सर्वात लोकप्रिय गझल गायक बनले. त्यांनी त्यांच्या मधुर आवाजाने भारतीयांचे मन जिंकले होते. भारता सोबतच परदेशात देखील त्यांच्या गायनाचा चाहता वर्ग मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकज उधास यांच्यावर उपचार सुरू होते. पंकज उधास यांनी शेवटचा श्वास आयसीयूमध्ये घेतला असल्याचे त्यांची कन्या नायाब उधास यांनी स्पष्ट केले आहे. पंकज उधास यांच्या निधनानंतर गीत संगीत क्षेत्रातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
ज्येष्ठ गज़ल गायक पंकज उधास कालवश.
61
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -