23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आरे देवीचीवाडी केंद्रशाळा देवगड तालुक्यात द्वितीय ; मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’अभियान.

- Advertisement -
- Advertisement -

मिठबाव | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनामार्फत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा ‘ योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान रबविण्यात आले. या अभियानात जि. प. पूर्ण प्राथ. केंद्रशाळा आरे – देवीचीवाडी शाळेने देवगड तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवत २ लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले आहे.

या अभियानात शाळेने अध्ययन – अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत शैक्षणिक गुणवत्ता, शालेय प्रशासनात सुव्यवस्था आणि सुसूत्रता, शाळेचे सौंदर्यीकरण, अमृतवाटिका, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता गृह, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छता मॉनिटर, व्यवसाय शिक्षण, अंगभूत कला – कौशल्य विकासासाठी उपक्रम, क्रीडागुणांचा विकास, क्षेत्रभेटी यांसारख्या विविध घटकांची परिणामकारक आणि प्रभावी अंमलबजावणी केल्याने शाळा या द्वितीय पुरस्कारासाठी पात्र ठरली.

शाळेच्या या यशाचे श्रेय विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांचे असल्याचे मत मुख्याध्यापक श्री. परमेश्वर जाधव यांनी सांगितले. तसेच शा. व्य. समितीच्या अध्यक्ष सौ. मानसी पाटोळे, उपाध्यक्ष श्री. राजू कदम, सरपंच सौ. ममता कदम, उपसरपंच श्री. रत्नदीप कांबळे, श्री. महेश पाटोळे, श्री. प्रकाश फाळके, श्री. अजित कांबळे, श्री. नितीन कोकम, श्री. शशिकांत कांबळे, सौ. सई कांबळे, अंगणवाडी सेविका सौ. अपेक्षा कोकम, सौ. वैभवी मालंडकर, श्रीम. संजना कोळंबेकर आदी शाळा प्रेमी ग्रामस्थ बंधू – भगिनी यांनी आपला बहुमोल वेळ शारीरिक, आर्थिक पाठबळ उभे केले त्याबद्दल आभार व्यक्त केले. पदवीधर शिक्षक श्री. विवेक कुलकर्णी, श्रीम. कोमल राऊत मॅडम, श्री. ज्ञानेश्वर सातपुते, श्री. भूषणकुमार जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच केंद्रप्रमुख श्री. आनंद राजम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मिठबाव | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनामार्फत 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा ' योजनेअंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान रबविण्यात आले. या अभियानात जि. प. पूर्ण प्राथ. केंद्रशाळा आरे - देवीचीवाडी शाळेने देवगड तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवत २ लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले आहे.

या अभियानात शाळेने अध्ययन - अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत शैक्षणिक गुणवत्ता, शालेय प्रशासनात सुव्यवस्था आणि सुसूत्रता, शाळेचे सौंदर्यीकरण, अमृतवाटिका, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता गृह, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छता मॉनिटर, व्यवसाय शिक्षण, अंगभूत कला - कौशल्य विकासासाठी उपक्रम, क्रीडागुणांचा विकास, क्षेत्रभेटी यांसारख्या विविध घटकांची परिणामकारक आणि प्रभावी अंमलबजावणी केल्याने शाळा या द्वितीय पुरस्कारासाठी पात्र ठरली.

शाळेच्या या यशाचे श्रेय विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांचे असल्याचे मत मुख्याध्यापक श्री. परमेश्वर जाधव यांनी सांगितले. तसेच शा. व्य. समितीच्या अध्यक्ष सौ. मानसी पाटोळे, उपाध्यक्ष श्री. राजू कदम, सरपंच सौ. ममता कदम, उपसरपंच श्री. रत्नदीप कांबळे, श्री. महेश पाटोळे, श्री. प्रकाश फाळके, श्री. अजित कांबळे, श्री. नितीन कोकम, श्री. शशिकांत कांबळे, सौ. सई कांबळे, अंगणवाडी सेविका सौ. अपेक्षा कोकम, सौ. वैभवी मालंडकर, श्रीम. संजना कोळंबेकर आदी शाळा प्रेमी ग्रामस्थ बंधू - भगिनी यांनी आपला बहुमोल वेळ शारीरिक, आर्थिक पाठबळ उभे केले त्याबद्दल आभार व्यक्त केले. पदवीधर शिक्षक श्री. विवेक कुलकर्णी, श्रीम. कोमल राऊत मॅडम, श्री. ज्ञानेश्वर सातपुते, श्री. भूषणकुमार जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच केंद्रप्रमुख श्री. आनंद राजम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!