24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

तर फोवकांडा पिंपळावरच्या गार्डनची वाताहात लागली नसती ; माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांची नगरपरिषद प्रशासनावर टीका.

- Advertisement -
- Advertisement -

पूर्वी शहरातील सौंदर्यात भर घालणारे एक सुशोभित स्थळ व परीसर आता डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील बनत असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची व्यक्त केली खंत ; फोवकांडा पिंपळावरील रिक्षा मंडळाचे बांधव, सध्या स्वयंस्फूर्तीने गार्डनची यथाशक्ती देखभाल करत असल्याचेही केले स्पष्ट.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी, फोवकांडा पिंपळ गार्डनच्या सध्याच्या अवस्थेबद्दल नगरपरिषद प्रशासनावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे टीका केली आहे. मालवण शहराच्या मध्यवर्ती असलेल्या फोवकांडा पिंपळ येथे मालवण नगर परिषदेचे हे गार्डन आहे.

महेश कांदळगांवकर यांनो केलेल्या आरोपात त्यांच्या व सहकारी नगरसेवकांच्या लोकप्रतिनिधी म्हणून सेवेच्या कालावधी मध्ये, या गार्डनचे सुशोभीकरण करण्यात आले होते. त्यात रंगीत कारंजा, डेकोरेटिव्ह लाईटस् असे शहरासाठी सुशोभनीय घटक होते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे गार्डन असल्याने पर्यटन दृष्ट्या सौदर्य वाढविणारे आहे असा विचार करुन ते पाऊल उचलले गेले होते. परंतु आता तेच गार्डन मागील दीड वर्षांपासून समस्या ग्रस्त आहे. त्यातील रंगीत कारंजा बंद आहे. तिकडे कारंज्याच्या साचलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या झालेल्या आहेत हे आरोग्यदृष्ट्या संवेदनशील. प्रवेशाचे फाटक मोडलेले आहे. डेकोरेटिव्ह दिवे बंद आहेत व याबाबत मागील दीड वर्ष आवाज उठवूनही अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही अशी खंत असल्याचेही माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी नमूद केली आहे. एकीकडे आपल्या जिल्ह्यातील नगर पालिका स्वच्छ सर्वेक्षण मध्ये बक्षीस मिळवत असताना मालवण नगर पालिका सुशेगात आहे. ती मालवणच्या लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे असा आरोप करत त्यांनी धूर फवारणी, औषध फवारणी करून डासांची उत्पत्ती स्थानके नष्ट करणे आवश्यक असताना याबाबत कुठलीही उपाययोजना केली जात नाही असेही सांगितले आहे. उलट सुशोभीकरण केलेल्या ठिकाणी अस्वच्छता होताना दिसत आहे. या ठिकाणची स्वच्छता करणाऱ्या ठेकेदारावर कुणाचा अंकुश नाही. त्याच्यावर दंडात्मक कारवाई केल्याचे दिसत नाही. सध्या या ठिकाणी फोवकांडा रिक्षा मंडळाच्या बांधवांकडून स्वयंस्फूर्तीने व यथाशक्ती देखभाल सुरु आहे असे महेश कांदळगांवकर यांनी स्पष्ट केले आहे.

फक्त एक दिवसाचे स्वच्छतेचे इव्हेंट करायचे ,त्यामध्ये नागरिकांना, सामाजिक संस्थांना सहभागी करून घेऊन फक्त शासनाला दाखविण्या इतपत फोटो सेशन करून घेतले जात आहे. एखाद्या कामाबाबत मागील दिड वर्षेपासून सातत्याने सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असेल तर मुख्याधिकारी हे मनमानी पद्धतीने काम करीत आहेत आणि त्याच्यावर कोणाचाही अंकुश नाही हे सिद्ध होत आहे .आम्ही केलेल्या सूचनांची कात्रण करून फाईलला लावण्यापेक्षा केबिन सोडून जर प्रत्यक्ष जाऊन कामाची पाहणी केली असती तर आमच्या काळात सुशोभीकरण केलेल्या एका गार्डनची असेहि वाताहत लागली नसती असे महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!