25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

माऊली मित्र मंडळाचे स्वच्छतेचे उपक्रम प्रेरणादायी आणि कौतुकास्पद ; जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर यांनी माऊली मित्रमंडळाचे उपक्रम जिल्ह्यातील सामाजिक मंडळांसाठी आदर्शवत असल्याचे केले प्रतिपादन.

- Advertisement -
- Advertisement -

माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळांची जिल्हा रुग्णालय परीसरात स्वच्छतेची जिल्हा – धून..!

कणकवली | प्रतिनिधी : ‘स्वच्छता हिच देशसेवा’ हे ब्रीद अंगिकारत माऊली मित्र मंडळ कणकवली आणि जुने भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ आणि संलग्न मित्रमंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर सुरु आहे.माऊली‌ मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालय परीसरात साफसफाई करुन स्वच्छतेची ‘जिल्हा – धून’ निर्माण केली आहे असे प्रतिपादन जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर यांनी केले. ते ओरोस जिल्हा रुग्णालय येथे स्वच्छता मोहीम कार्यक्रमाच्या शुभारंभा प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग चे डॉ.श्याम पाटील,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ.अतुल त्रिपाटे, डॉ. अमित आवळे , डॉ. तुषार चिपळूणकर, एम.एन.तेली, सत्यवान कदम, श्री सुनील राणे, नितीन हेगडे उपस्थित होते.

या स्वच्छता सेवेत श्री माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, अविनाश गावडे, महानंद चव्हाण, सी.आर.चव्हाण, प्रभाकर कदम, सईद नाईक,भगवान कासले, सुभाष उबाळे, पंढरी जाधव, ज्ञानदेव मोडक आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ.तुषार चिपळूणकर‌ पुढे म्हणाले की, माऊली मित्र मंडळाचे स्वच्छतेचे हे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे .जिल्ह्यातील मंडळे आणि संस्थासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यावेळी बोलताना म्हणाले की,सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री.किशोर तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून माऊली मित्र मंडळ कणकवली आणि संलग्न मित्रमंडळाच्या वतीने जिल्हा रुग्णालयातील परीसरात आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यापुढेही अशीच स्वच्छता मोहीम राबविणार असून स्वच्छतेचा वसा पुढे सुरु ठेवणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. प्लास्टिक वस्तू तसेच पिशव्यांचा वापर टाळला पाहिजे. जिल्ह्यात जनजागृती करण्याच्या दृष्टीने माऊली मित्र मंडळ आणि संलग्न मित्रमंडळाच्या वतीने जिल्हा रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. माऊली मंडळाचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांनी सांगितले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळांची जिल्हा रुग्णालय परीसरात स्वच्छतेची जिल्हा - धून..!

कणकवली | प्रतिनिधी : 'स्वच्छता हिच देशसेवा' हे ब्रीद अंगिकारत माऊली मित्र मंडळ कणकवली आणि जुने भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ आणि संलग्न मित्रमंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर सुरु आहे.माऊली‌ मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालय परीसरात साफसफाई करुन स्वच्छतेची 'जिल्हा - धून' निर्माण केली आहे असे प्रतिपादन जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर यांनी केले. ते ओरोस जिल्हा रुग्णालय येथे स्वच्छता मोहीम कार्यक्रमाच्या शुभारंभा प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग चे डॉ.श्याम पाटील,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ.अतुल त्रिपाटे, डॉ. अमित आवळे , डॉ. तुषार चिपळूणकर, एम.एन.तेली, सत्यवान कदम, श्री सुनील राणे, नितीन हेगडे उपस्थित होते.

या स्वच्छता सेवेत श्री माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, अविनाश गावडे, महानंद चव्हाण, सी.आर.चव्हाण, प्रभाकर कदम, सईद नाईक,भगवान कासले, सुभाष उबाळे, पंढरी जाधव, ज्ञानदेव मोडक आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ.तुषार चिपळूणकर‌ पुढे म्हणाले की, माऊली मित्र मंडळाचे स्वच्छतेचे हे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे .जिल्ह्यातील मंडळे आणि संस्थासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यावेळी बोलताना म्हणाले की,सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री.किशोर तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून माऊली मित्र मंडळ कणकवली आणि संलग्न मित्रमंडळाच्या वतीने जिल्हा रुग्णालयातील परीसरात आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यापुढेही अशीच स्वच्छता मोहीम राबविणार असून स्वच्छतेचा वसा पुढे सुरु ठेवणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. प्लास्टिक वस्तू तसेच पिशव्यांचा वापर टाळला पाहिजे. जिल्ह्यात जनजागृती करण्याच्या दृष्टीने माऊली मित्र मंडळ आणि संलग्न मित्रमंडळाच्या वतीने जिल्हा रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. माऊली मंडळाचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!