शिवजयंती उत्सव आयोजीत करुन त्यात कारसेवकांचा सत्कार करायच्या संकल्पनेबद्दल भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी श्री. सौरभ ताम्हणकर व मित्रमंडळाची केली मुक्तकंठाने प्रशंसा.
मालवण |सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्याचे युवा सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस श्री. सौरभ ताम्हणकर व मित्र मंडळाच्या वतीने मालवण तालुक्यातील अयोध्येत १९९० व १९९२ साली कारसेवा बजावलेल्या कारसेवकांचा सत्कार समारंभ व शिवजयंतीनिमित्त मंडळातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मालवण राजकोट किल्ला येथे २० फेब्रुवारीला संपन्न झाला. यावेळी अयोध्येत कार सेवा बजावलेल्या कारसेवकांचे सत्कार भाजपा युवा नेते व माजी खासदार श्री. निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. मायेची शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व अयोध्या येथे स्थापन करण्यात आलेल्या श्री प्रभू रामलल्ला यांची प्रतिमा भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
अयोध्येत राम मंदिर आणि देशात राम उत्सव हा आजचा दिवस कार सेवकांमुळे आहे. त्यांचे कार्य आणि हिम्मत प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे. त्याकाळी जी सेवा ह्यांनी बजावली त्यांच्या सेवेला सलाम आहे व अशा लोकांनाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणं हे सौरभ ताम्हणकर व मित्र मंडळाचे काम हे कौतुगास्पद आहे असे निलेश राणे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने मालवण राजकोट किल्लावर कारसेवकांचे सत्कार व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर भाजप नेते व माजी खासदार श्री. निलेश राणे, प्रमुख अतिथी डॉ. सुभाष दिघे, प्रमुख वक्ते डॉ. मिलिंद कुलकर्णी, कारसेवक श्री. विलास हडकर, श्री. भाऊ सामंत, श्री. श्रीधळ काळे, कारसेवक श्री. झुंजार हळमळकर, मजदूर युनियनचे श्री. हरी चव्हाण, श्री. समिर गवाणकर, कारसेवक संजय गवंडी, कारसेविका सावित्री सत्यवान तथा माई खोत, कारसेवक श्री. विनय आंगणे, कारसेवक श्री. अरुण सुर्वे, कारसेवक श्री. देविदास रावले यांचे कुटुंब प्रतिनिधी, जिल्हा बॅन्क संचालक बाबा परब उपस्थित होते. यावेळी डॉ सुभाष दिघे यांनी कारसेवेतला प्रवास कथान करत हिंदू संघटन जे टिकलेला आहे ते वाटत गेलं पाहिजे जर संपूर्ण समाज संघटीत झाला तर आपल्या जवळ कोणी वाकडी नजरे बघू शकणार नाही व हिंदू राष्ट्राचा विचार सर्वांनी पुढे न्यावा असे आवाहन यांनी यावेळी केले. डाॅ. दिघे यांनी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे काम केलेले दिवस हे अक्षरशः मंतरलेले दिवस होते असेही सांगितले.
कारसेवक श्री विलास हडकर यांनी आपले कारसेवा तथा कारसेवेबद्दल अनुभव सांगितले. सध्या आपल्या समोर जी काही परिस्थिती आहे त्यापेक्षा विपरीत परिस्थिती ही आयोध्ये मध्ये १९९० मध्ये होती. त्यावेळी एका अर्थाने मोगलाईचा वारसा चालवणाऱ्या मुलायम सिंगाचे राज्य होत आणि प्रभू रामचंद्राच मंदिर कोणत्याही परिस्थिती उभा राहू देणार नाही ही जी मोघली इच्छा होती व त्या इच्छेच प्रतिक असणार मुलायम सिंग यादव ने म्हटलं होत की या ठिकाणी एकही कारसेवक पोहचणार नाही आणि जी वास्तू आहे त्याठिकाणी कार सेवा घडणार नाही त्यासाठी त्यानी अतूट प्रयत्न केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री असल्याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला होता. वास्तूपासून २०० किलो मिटरच्या बाहेर वाहने थांबवली जात होती रेल्वे सुद्धा बंद होती. अयोध्यात एक चिटपाखरू देखील उडू शकणार नाही असे त्यांचं वाक्य होतं. अशा या ठिकाणी ३० ऑक्टोबर १९९० ला लाखो करसेवक राम नामाचा उद्घोष करत अयोध्येत बाहेर पडले. त्या विवादीत वास्तुवर हजारोच्या संख्येने कारसेवक हे चालून गेले व त्या मध्ये अनेक कारसेवक यांनी आपले प्राणही गमावले. प्रामुख्याने दोन कारसेवक म्हणजे शरद कोठारी व त्यांचे बंधु असे कोठारी बंधु या दोघांनी ५०० वर्षांपूर्वी ज्या वास्तू वरून प्रभू श्री राम मंदिरा वरून जो भगवा ध्वज खाली उतरला होता तो भगवा ध्वज १९९० मध्ये या कोठारी बंधु व इतर कारसेवकांनी फडकावला ही सर्वांसाठी अभिमनस्पद गोष्ट आहे. परंतु मुगलांचा वारसा ज्यांच्या जवळ होता त्या मुलायम सिंगाची तळ पायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी २ नोव्हेंबरला निष्पाप असलेल्या कारसेवकांना त्यांच्या सुरक्षा यंत्रणेने काही प्रतिसाद त्यांना दिला नाही म्हणून त्यांनी तुरुंगात असणाऱ्या गुंडाना बाहेर सोडून पोलिसांचे गणवेश त्यांच्या अंगावर चढवून निर्दयी असा गोळीबार केला. त्यात कोठारी डोक्याला बंदूकीची नळी लावून त्या दोन्ही बंधुंचा घात केला. लाखो कारसेवकांवर गोळीबार केला. हजारो कारसेवक जखमी झाले. मला १९९० नंतर १९९२ साली मला पुन्हा कारसेवेत जाण्याचा योग आला व त्यावेळी हिंदुत्वाचं प्रतिनिधित्व करणार कल्याण सिंगाच सरकार होत त्यामुळे आयोध्येत जाताना काही आडकाठी आली नाही सर्व कारसेवक व्येवस्थीत वेळेवर पोहोचले. लाखोंच्या संख्येने कारसेवक हे एकत्र आलेले होते. परंतु घरातून निघताना घराततून सांगण्यात यायचं गेल्यावेळी करसेवेला गेलात परंतु तो धाचा पाडून आला नाही पण ह्या वेळी करसेवेला जातंय परत घरी यायच असेल तोंड धाकवायचं असेल तर धाचा पडूनच या आणि आपल्या सगळ्यांना अभिमानस्पद बाब आहे. असे यावेळी कारसेवक श्री. विलास हडकर यांनी आपले अनुभव व्यक्त केले.
माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांच्या भावना मांडताना करसेवकांचे बलिदान श्रेष्ठ व अमूल्य असल्याचे सांगितले. आपण या कारसेवकांच्या सानिध्यात आहोत हे भाग्याचं आहे असंही ते म्हणाले. यावेळी निलेश राणे यांनी बोलताना सौरभ ताम्हणकर व मित्रमंडळानी जो कारसेवकांचा कार्यक्रम घेतला व त्याही अगोदर तो सुचला त्यासाठी त्यांची प्रशंसा केली. ‘अनेक’ लोकांना आपल्या पूर्वीची पिढी काय करून गेली व त्याचे महत्व काय हे पुढच्या पिढीला कळावं असं वाटत देखील नसतं. कारसेवकांनी आपल्या देशा साठी दिलेला बलिदान आणि योगदान हे दोन्ही लक्ष्यात ठेऊन हा कार्यक्रम आयोजित या करिता निलेश राणे यांनी प्रशंसात्मक आभार मानले.
सौरभ ताम्हणकर आणि मित्रमंडळाच्या वतीने, माजी खासदार निलेश राणे, प्रमुख अतीथी डाॅ. दिघे, प्रमुख वक्ते डाॅ कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला.
सौरभ ताम्हणकर मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याचा बक्षीस वितरण या कार्यक्रम दरम्यान संपन्न झाले. चित्रकला स्पर्धा विजेते लहान गट – प्रथम क्रमांक आभा उमेश परब, द्वितीय क्रमांक अथर्व प्रसाद आडवलकर, तृतीय क्रमांक प्रथमेश प्रमोद चव्हाण, मोठा गट – प्रथम क्रमांक रुद्राक्ष अरुण विठ्ठलकर, द्वितीय क्रमांक पार्थ मेस्त्री, तृतीय क्रमांक – मयुरेश वायगणकर, खुला गट – प्रथम क्रमांक साई पारकर, द्वितीय क्रमांक साईराज बादेकर.
रांगोळी स्पर्धेत – खुला गट – प्रथम क्रमांक पार्थ मेस्त्री, द्वितीय क्रमांक राहुल चव्हाण तर तुळस सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक अंजली आंबेरकर, द्वितीय क्रमांक याज्ञिका वराडकर, तृतीय क्रमांक – श्रेया मांजरेकर यांनी यश संपादन केले. स्पर्धेचे परीक्षण कला शिक्षक श्री. बी जी सामंत व कलाशिक्षक श्री समीर चंदरकर यांनी पाहिलं. यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचे मायेची शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व आयोध्या येथे स्थापन करण्यात आलेल्या श्री प्रभू रामलल्ला यांची प्रतिमा भेट देण्यात आली तर त्याठिकाणी असलेल्या कला शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला. चित्रकला व रांगोळी स्पर्धेत एकूण ११२ कलाकारांनी सहभाग दर्शविला होता.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाजयुमो शहर अध्यक्ष ललित चव्हाण, माजी नगरसेवक पंकज सादये, उद्योजक राजू बिडये, नंदू देसाई, मालवण कारसेवकांचे कुटुंबीय व मालवण वासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी अयोध्येचा ११३० साला पासून इतिहास कथन केला आणि प्रभू श्रीराम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्याचा त्यांचा अभ्यास कथन केला. यावेळी सौरभ ताम्हणकर मित्रमंळाचे कार्यकर्ते निशय पालेकर, राकेश सामंत, ज़ुबेर खान, कुणाल खानोलकर, फ्रँसिस फर्नांडिस, गौरव लुडबे, लौकिक कांदळकर, तुषार वाघ, तन्मय पराडकर, आदित्य मोर्जे, सागर कापडोसर यांनी हा कार्यक्रम यशवी होण्यास सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अक्षय सातार्डेकर यांनी केले.