मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे श्री भगवती हायस्कुल तीठा नजीक सोलर हायमास्ट दिव्याचे उदघाटन नुकतेच झाले. आमदार नितेश राणे यांच्या स्थानिक विकास काम निधी अंतर्गत सुमारे पाच लाख रुपयांच्या निधीतून सदर काम पूर्ण झाले आहे. डॉक्टर के. एन. नायसे व सेवानिवृत्त पो. नि. चंद्रकांत रासम यांच्या हस्ते उदघाटन झाले. हायमास्ट मंजुरी साठी तत्कालीन सरपंच सौ. साक्षी गुरव व भाजप नेते तथा मुणगे सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत यांनी आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधले होते.तत्कालीन सरपंच सौ साक्षी गुरव आणि भाजप नेते गोविंद सावंत यांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे आमदार नितेश राणे यांनी हायमास्ट दिव्याची गरज ओळखून आणि मुणगे ग्रामस्थ यांची मागणी असल्याने तत्काळ सोलर हायमास्ट मंजूर करून ५ लाखांचा निधी देऊन ग्रामस्थांची गैरसोय दूर केल्या बद्दल आमदार नितेश राणे यांचे गोविंद सावंत यांचे आभार मानले आहेत.
यावेळी सरपंच सौ अंजली सावंत, सदस्य संजय घाडी, सौ साक्षी गुरव, भाजप नेते गोविंद सावंत, मनोज सावंत, सुनील सावंत, नारायण सावंत, श्रीपाद बागवे, संतोष लबदे, अरविंद सावंत, निशांत रासम, कृष्णकांत गुरव, दादा वळंजू, अनिरुद्ध कारेकर, तारामती पुजारे, पल्लवी सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.