मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी, ऑक्टोबर २०२३ मध्ये पार पडलेल्या एलिमेंट्री व इंटरमिजिएट या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा निकालात शंभर टक्के यश संपादन केले आहे. एलिमेंटरी ग्रेड परीक्षा निकाल पुढील प्रमाणे आहे.
अ श्रेणी मध्ये : कु.मृगाक्षी मंगेश हिर्लेकर,
अनुराधा आनंद कदम, तर ब श्रेणी मध्ये साक्षी रविंद्र मुणगेकर, श्रावणी परेश माटवकर, सुहानी सत्यवान लब्दे, सोहम प्रमोद हिर्लेकर,अथर्व पटवर्धन, लावण्या लक्ष्मण पटकारे, अश्विनी अनिल परब. क श्रेणी मध्ये : हर्षल दिपक खोत याने यश प्राप्त केले.
इंटरमिजिएट परीक्षेमध्ये अ श्रेणीमध्ये विवेक मोहन परब याने यश मिळवले. ब श्रेणीमध्ये : दीक्षा मुणगेकर, अर्चिता कदम, गायत्री मेस्त्री, विराज मुणगेकर, स्वयम रुपये, सानिका सावंत, रिया सावंत, ईश्वरी राणे, रिया रासम, देवांग मेस्त्री यांनी यश प्राप्त केले. तर क श्रेणीमध्ये आदिती देवळी, लीनांगी मुणगेकर, कस्तुरी परुळेकर, तन्वी राणे, मंजिरी सावंत, प्रेक्षा सावंत, गोरख वळंजु, राखी लब्दे, सिद्धी परब, कार्तिकी लब्दे, विदित रासम, शर्वरी परब यांनी यश मिळविले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या कलाशिक्षिका सौ. गौरी तवटे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गातून अभिनंदन होत आहे