24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवण तालुका पत्रकार समिती यांचा ‘पुरस्कार वितरण सोहळा २०२३’ उत्साही वातावरणात संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

प्रमुख अतिथी आमदार वैभव नाईक, मराठी पत्रकार परीषदेच्या उपाध्यक्ष जान्हवी पाटील, उद्योजक दीपक परब आणि माजी नगरसेवक नितीन वाळके, सेवानिवृत्त उपमुख्य कार्य.अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे सद्य स्थितितील पत्रकारीता व पत्रकार यांविषयी प्रबोधनात्मक मार्गदर्शन.

पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तालुका अध्यक्ष संतोष गावडे यांसह अनेक दिग्गज मान्यवर आणि मालवण तालुका पत्रकार समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित.

मालवण | सुयोग पंडित : उद्याच्या वृत्तपत्रात काय आहे हे उत्कंठेने वाचता यावे अशी पत्रकारिता करावी आणि राजकीय, सामाजीक अशा सर्वच घटकांना पत्रकारितेच्या व्याप्तीचा फायदा व्हावा असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी मालवण मध्ये संपन्न झालेल्या मालवण तालुका पत्रकार समिती पुरस्कार वितरण २०२३ कार्यक्रमात केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे आज १५ फेब्रुवारीला मालवण तालुका पत्रकार समितीचा २०२३ सालसाठीचा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. तालुक्यातील पत्रकारांना उपस्थित मान्यवरांनी केलेले जाणीवांचे मार्गदर्शन आणि पथ्रकारितेतील स्थित्यंतरे यांचे विश्लेषणात्मक बौद्धिक अशा ‘कार्यशाळा’ जाणिवेतील सोहळ्याला मालवण तालुका पत्रकार समिती पत्रकार बांधव सदस्यांनी अत्यंत सकारात्मक व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक, पत्रकार परिषद उपाध्यक्ष जान्हवी पाटील, सेवानिवृत्त उपमुख्य कार्य. अधिकारी ( जि.प. ) श्री राजेंद्र पराडकर, सिंधुदुर्ग काॅलेज प्रभारी प्राध्यापक राबते हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या नंतर उपस्थित सर्व प्रमुख अतिथींना व मान्यवरांना मालवण तालुका पत्रकार समितीतर्फे मंचावर सहर्ष आमंत्रित केले गेले. या नंतर सर्व प्रमुख अतिथी व मंचावरील मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मंचावर प्रमुख अतिथींसह मान्यवर म्हणून उद्योजक दीपक परब, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणी सदस्य महेश सरनाईक, रंगभूषाकार तारक कांबळी, ज्येष्ठ पत्रकार रमाकांत सामंत, माजी नगरसेवक नितीन वाळके, मालवण तालुका पत्रकार समिती तालुका अध्यक्ष संतोष गावडे, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर, शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर,उद्योजक भाऊ सामंत, पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष नंदकिशोर महाजन उपस्थित होते.

मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पत्रकार समितीची ध्येयधोरणे तसेच तालुक्यातल्या पत्रकार बांधवांच्या या विशेष सोहळ्याबद्दल मनोगत व्यक्त केले. यानंतर सोहळ्याला उपस्थित पुरस्कार प्राप्त पत्रकार बांधवांचे कुटुंबीय आणि प्रतिष्ठीत मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यानंतर पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या दरम्यान श्री गणेश चतुर्थीनिमित्त मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने पत्रकार कुटुंबियांसाठी आयोजीत पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांना आमदार वैभव नाईक, जान्हवी पाटील व राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

यानंतर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हा पत्रकार संघाने केलेल्या भरीव कामाचा आढावा घेतला. ओरोस येथील जिल्हा पत्रकार संघाचे बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकार भवन निर्मिती पर्यंतचा तम, मध, धन लावून झालेला खडतर प्रवास त्यांनी कथन केला. पत्रकार कधीच निवृत्त होत नसतो हे सांगताना त्यांनी पत्रकार बांवांच्या सर्वंकष सक्षमीकरणा बद्दल मार्गदर्शन केले. यानंतर मालवणचे माजी नगरसेवक नितीन वाळके यांनी आजच्या पत्रकारिता, त्यांतील त्यांना जाणवणार्या त्रुटी, भाषाशैली यावर त्यांच्या भाषणात मार्मिक चिमटे काढले. उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनी अत्यंत सकारात्मक पद्धतीने त्याला प्रतिसाद देत दाद दिली. या नंतर मंचावरील मान्यवर शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकारांनी त्यांच्या पत्रकारितेच्या अथांग सागरातील नौकेचा प्रवास हा दोन्ही बाजुंना वल्ही मारुन केला तर पत्रकारीतेची नौका योग्य दिशेने व काळाच्या उचित वेगाने चालत राहील असे सांगितले.

या नंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते मालवण तालुका पत्रकार समितीच्या २०२३ च्या पुरस्कारांचे वितरण झाले. प्रमुख अतिथींच्या यांच्या हस्ते पत्रकार श्री. प्रशांत हिंदळेकर यांना अमित खोत व मालवण पत्रकार समिती पुरस्कृत ‘बेस्ट स्टोरी ॲवाॅर्ड’ ने गौरविण्यात आले. यानंतर पत्रकार श्री. झुंजार पेडणेकर यांना स्वर्गीय भाईसाहेब खंडाळेकर स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले तर पत्रकार श्री. महेंद्र पराडकर यांना स्वर्गीय नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरुप होते.

या पुरस्कार सोहळ्यात दोन विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. उद्योजक श्री श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांना मालवण रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले तर रंगभूषाकार श्री तारक कांबळी कलारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. मालवण रत्न पुरस्कार प्राप्त उद्योजक दीपक परब यांनी पुरस्काराबद्दल मालवण पत्रकार समितीचे आभार मानले व सदिच्छा देताना पत्रकारितेतील शिकाऊ व टिकाऊपणा यावर सखोल भाष्य केले. कलारत्न पुरस्कार प्राप्त रंगभूषाकार तारक कांबळी यांनी मालवण तालुका पत्रकार समितीचे आभार मानले व आपला कला प्रवास व कलेची सेवा अशीच सुरु राहील असे मनोगत व्यक्त केले.

पुरस्कार प्राप्त पत्रकार बांधवांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. पत्रकार प्रशांत हिंदळेकर यांनी त्यांच्या २५ वर्षांच्या पत्रकारितेतील दीपस्तंभांना श्रेय दिले. पत्रकार झुंजार पेडणेकर यांनी पत्रकारितेच्या सुरवातीपासूनचे मार्गदर्शकांना वंदन केले आणि त्यांच्या पत्नी सौ. प्राजक्ता पेडणेकर यांना त्यांच्या पुरस्कारात श्रेय सहभागी केले. पत्रकार महेंद्र पराडकर यांनी ज्या स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण व पत्रकारीता कशी हातात हात घालून सुरु झाली होती व आजही २० वर्षांनंतर पत्रकारिते रोज काहीतरी ‘आव्हानात्मक मिशन’ पूर्ण करायला प्रोत्साहन देणार्या घटकांचे विश्लेषण केले. महेंद्र पराडकर यांनी त्यांच्या पत्रकारितेचे श्रेय त्यांचे गाबीत समाज ज्ञाती बांधव यांना देताना त्यांची अदृश्य कृपा असल्याने आपल्या पत्रकार प्रवासाला सामर्थ्य मिळते असे सांगितले.

मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा विशेष सत्कार तालुका अध्यक्ष संतोष गावडे व जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी केला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मान्यवरांसह माजी नगरसेवक मंदार केणी, मच्छिमार नेते पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, महिला कार्यकर्त्या दीपा शिंदे, मालवण तालुका पत्रकार समिती उपाध्यक्ष कृष्णा ढोलम , उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, मालवण तालुका पत्रकार समिती सदस्य अमित खोत,परेश सावंत, उदय बापार्डेकर,अनिल तोंडवळकर, दादा बापार्डेकर, विशाल वाईरकर, भाऊ भोगले, सिद्धेश आचरेकर, कुणाल मांजरेकर, आप्पा मालंडकर, समीर म्हाडगुत, गणेश आचरेकर, पि के चौकेकर, भूषण मेथर, प्रफुल्ल देसाई, शैलेश मसुरकर, छायाचित्र पत्रकार समीर म्हाडगुत, छायाचित्र पत्रकार नारायण धुरी उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त उद्योजक दीपक परब यांच्या पत्नी उद्योजिका सौ. राधिका दीपक परब, भंडारी समाज अध्यक्ष मसुरे पंढरीनाथ मसुरकर, पुरस्कार प्राप्त पत्रकार झुंजार पेडणेकर यांचे वडिल श्री मेघःश्याम पेडणेकर, आत्या सौ. मालती सावंत, श्री दगडू सावंत, बंधू दीपक पेडणेकर, झुंजार पेडणेकर यांच्या पत्नी सौ. प्राजक्ता पेडणेकर, कन्या मनस्वी तसेच साई बागवे, बाबू मुळीक, ध्वनी संयोजक संजय कासवकर, शिवसेना उपतालुका प्रमुख, उमेश मांजरेकर, युवासेना पदाधिकारी, अनंत पाटकर, दत्तगुरु पोईपकर, प्रशांत आडवणकर, सिद्धेश मांजरेकर, अभय कदम, भूषण म्हापणकर आणि स कि सिंधुदुर्ग विद्यालयाचे प्राध्यापक वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी व कर्मचारी उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका पत्रकार समिती सदस्य संग्राम कासले यांनी मखमली खुमासदारपणे केले. पुरस्कारांच्या मानपत्रांचे वाचन पत्रकार अमित खोत यांनी केले. तालुका पत्रकार समिती उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी पुरस्कार सोहळा आयोजनात सहकार्य केलेल्या सर्व घटकांचे, प्रमुख अतिथींचे मान्यवरांचे व उपस्थित पत्रकार बांधवांच्या परिवाराचे आभार मानले. दत्तप्रसाद पेडणेकर यांनी स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय व संस्थेचे आयोजनाला सभागृह उपलब्ध करुन दिल्याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त केली.

मालवणचे माजी नगरसेवक नितीन वाळके यांनी आजच्या पत्रकारांना वाचन वाढवायचा दिलेला अध्यात्मिक कानमंत्र ठरला. पत्रकार हा नेहमी समाजातील सर्व घटकांसाठी व घटनांसाठी झटतो. स्वतःची तहानभूक हरपणार्या पत्रकार बांधवांनी त्यांच्या भविष्याचे नेटके नियोजन करावे. पत्रकारितेतील आत्मा जपताना विविध शासकीय योजनांचाही वेळोवेळी अभ्यास करावा जेणेकरुन प्रपंच सांभाळताना पत्रकार प्रसन्न राहतील असे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद उपमुख्य कार्य अधिकारी श्री राजेंद्र पराडकर यांचे मार्गदर्शन आणि पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्ष जान्हवी पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांचे पत्रकार भवन उभारणीबद्दल केलेले विशेष कौतुक हे ही या सोहळ्यातील प्रोत्साहनपर मुद्दे ठरले. आमदार वैभव नाईक यांनी समाज, राजकीय स्थानामध्ये मालवण तालुका पत्रकार समितीची केलेली प्रशंसा व मालवण तालुका पत्रकार समिती सी एक आपलाच परिवार वाटतो अशी भावना कार्यक्रमातील सात्विक व भावनिक वैशिष्ट्य ठरले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

प्रमुख अतिथी आमदार वैभव नाईक, मराठी पत्रकार परीषदेच्या उपाध्यक्ष जान्हवी पाटील, उद्योजक दीपक परब आणि माजी नगरसेवक नितीन वाळके, सेवानिवृत्त उपमुख्य कार्य.अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे सद्य स्थितितील पत्रकारीता व पत्रकार यांविषयी प्रबोधनात्मक मार्गदर्शन.

पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तालुका अध्यक्ष संतोष गावडे यांसह अनेक दिग्गज मान्यवर आणि मालवण तालुका पत्रकार समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित.

मालवण | सुयोग पंडित : उद्याच्या वृत्तपत्रात काय आहे हे उत्कंठेने वाचता यावे अशी पत्रकारिता करावी आणि राजकीय, सामाजीक अशा सर्वच घटकांना पत्रकारितेच्या व्याप्तीचा फायदा व्हावा असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी मालवण मध्ये संपन्न झालेल्या मालवण तालुका पत्रकार समिती पुरस्कार वितरण २०२३ कार्यक्रमात केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे आज १५ फेब्रुवारीला मालवण तालुका पत्रकार समितीचा २०२३ सालसाठीचा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. तालुक्यातील पत्रकारांना उपस्थित मान्यवरांनी केलेले जाणीवांचे मार्गदर्शन आणि पथ्रकारितेतील स्थित्यंतरे यांचे विश्लेषणात्मक बौद्धिक अशा 'कार्यशाळा' जाणिवेतील सोहळ्याला मालवण तालुका पत्रकार समिती पत्रकार बांधव सदस्यांनी अत्यंत सकारात्मक व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक, पत्रकार परिषद उपाध्यक्ष जान्हवी पाटील, सेवानिवृत्त उपमुख्य कार्य. अधिकारी ( जि.प. ) श्री राजेंद्र पराडकर, सिंधुदुर्ग काॅलेज प्रभारी प्राध्यापक राबते हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या नंतर उपस्थित सर्व प्रमुख अतिथींना व मान्यवरांना मालवण तालुका पत्रकार समितीतर्फे मंचावर सहर्ष आमंत्रित केले गेले. या नंतर सर्व प्रमुख अतिथी व मंचावरील मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मंचावर प्रमुख अतिथींसह मान्यवर म्हणून उद्योजक दीपक परब, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणी सदस्य महेश सरनाईक, रंगभूषाकार तारक कांबळी, ज्येष्ठ पत्रकार रमाकांत सामंत, माजी नगरसेवक नितीन वाळके, मालवण तालुका पत्रकार समिती तालुका अध्यक्ष संतोष गावडे, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर, शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर,उद्योजक भाऊ सामंत, पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष नंदकिशोर महाजन उपस्थित होते.

मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पत्रकार समितीची ध्येयधोरणे तसेच तालुक्यातल्या पत्रकार बांधवांच्या या विशेष सोहळ्याबद्दल मनोगत व्यक्त केले. यानंतर सोहळ्याला उपस्थित पुरस्कार प्राप्त पत्रकार बांधवांचे कुटुंबीय आणि प्रतिष्ठीत मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यानंतर पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या दरम्यान श्री गणेश चतुर्थीनिमित्त मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने पत्रकार कुटुंबियांसाठी आयोजीत पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांना आमदार वैभव नाईक, जान्हवी पाटील व राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

यानंतर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हा पत्रकार संघाने केलेल्या भरीव कामाचा आढावा घेतला. ओरोस येथील जिल्हा पत्रकार संघाचे बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकार भवन निर्मिती पर्यंतचा तम, मध, धन लावून झालेला खडतर प्रवास त्यांनी कथन केला. पत्रकार कधीच निवृत्त होत नसतो हे सांगताना त्यांनी पत्रकार बांवांच्या सर्वंकष सक्षमीकरणा बद्दल मार्गदर्शन केले. यानंतर मालवणचे माजी नगरसेवक नितीन वाळके यांनी आजच्या पत्रकारिता, त्यांतील त्यांना जाणवणार्या त्रुटी, भाषाशैली यावर त्यांच्या भाषणात मार्मिक चिमटे काढले. उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनी अत्यंत सकारात्मक पद्धतीने त्याला प्रतिसाद देत दाद दिली. या नंतर मंचावरील मान्यवर शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकारांनी त्यांच्या पत्रकारितेच्या अथांग सागरातील नौकेचा प्रवास हा दोन्ही बाजुंना वल्ही मारुन केला तर पत्रकारीतेची नौका योग्य दिशेने व काळाच्या उचित वेगाने चालत राहील असे सांगितले.

या नंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते मालवण तालुका पत्रकार समितीच्या २०२३ च्या पुरस्कारांचे वितरण झाले. प्रमुख अतिथींच्या यांच्या हस्ते पत्रकार श्री. प्रशांत हिंदळेकर यांना अमित खोत व मालवण पत्रकार समिती पुरस्कृत 'बेस्ट स्टोरी ॲवाॅर्ड' ने गौरविण्यात आले. यानंतर पत्रकार श्री. झुंजार पेडणेकर यांना स्वर्गीय भाईसाहेब खंडाळेकर स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले तर पत्रकार श्री. महेंद्र पराडकर यांना स्वर्गीय नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरुप होते.

या पुरस्कार सोहळ्यात दोन विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. उद्योजक श्री श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांना मालवण रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले तर रंगभूषाकार श्री तारक कांबळी कलारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. मालवण रत्न पुरस्कार प्राप्त उद्योजक दीपक परब यांनी पुरस्काराबद्दल मालवण पत्रकार समितीचे आभार मानले व सदिच्छा देताना पत्रकारितेतील शिकाऊ व टिकाऊपणा यावर सखोल भाष्य केले. कलारत्न पुरस्कार प्राप्त रंगभूषाकार तारक कांबळी यांनी मालवण तालुका पत्रकार समितीचे आभार मानले व आपला कला प्रवास व कलेची सेवा अशीच सुरु राहील असे मनोगत व्यक्त केले.

पुरस्कार प्राप्त पत्रकार बांधवांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. पत्रकार प्रशांत हिंदळेकर यांनी त्यांच्या २५ वर्षांच्या पत्रकारितेतील दीपस्तंभांना श्रेय दिले. पत्रकार झुंजार पेडणेकर यांनी पत्रकारितेच्या सुरवातीपासूनचे मार्गदर्शकांना वंदन केले आणि त्यांच्या पत्नी सौ. प्राजक्ता पेडणेकर यांना त्यांच्या पुरस्कारात श्रेय सहभागी केले. पत्रकार महेंद्र पराडकर यांनी ज्या स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण व पत्रकारीता कशी हातात हात घालून सुरु झाली होती व आजही २० वर्षांनंतर पत्रकारिते रोज काहीतरी 'आव्हानात्मक मिशन' पूर्ण करायला प्रोत्साहन देणार्या घटकांचे विश्लेषण केले. महेंद्र पराडकर यांनी त्यांच्या पत्रकारितेचे श्रेय त्यांचे गाबीत समाज ज्ञाती बांधव यांना देताना त्यांची अदृश्य कृपा असल्याने आपल्या पत्रकार प्रवासाला सामर्थ्य मिळते असे सांगितले.

मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा विशेष सत्कार तालुका अध्यक्ष संतोष गावडे व जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी केला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मान्यवरांसह माजी नगरसेवक मंदार केणी, मच्छिमार नेते पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, महिला कार्यकर्त्या दीपा शिंदे, मालवण तालुका पत्रकार समिती उपाध्यक्ष कृष्णा ढोलम , उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, मालवण तालुका पत्रकार समिती सदस्य अमित खोत,परेश सावंत, उदय बापार्डेकर,अनिल तोंडवळकर, दादा बापार्डेकर, विशाल वाईरकर, भाऊ भोगले, सिद्धेश आचरेकर, कुणाल मांजरेकर, आप्पा मालंडकर, समीर म्हाडगुत, गणेश आचरेकर, पि के चौकेकर, भूषण मेथर, प्रफुल्ल देसाई, शैलेश मसुरकर, छायाचित्र पत्रकार समीर म्हाडगुत, छायाचित्र पत्रकार नारायण धुरी उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त उद्योजक दीपक परब यांच्या पत्नी उद्योजिका सौ. राधिका दीपक परब, भंडारी समाज अध्यक्ष मसुरे पंढरीनाथ मसुरकर, पुरस्कार प्राप्त पत्रकार झुंजार पेडणेकर यांचे वडिल श्री मेघःश्याम पेडणेकर, आत्या सौ. मालती सावंत, श्री दगडू सावंत, बंधू दीपक पेडणेकर, झुंजार पेडणेकर यांच्या पत्नी सौ. प्राजक्ता पेडणेकर, कन्या मनस्वी तसेच साई बागवे, बाबू मुळीक, ध्वनी संयोजक संजय कासवकर, शिवसेना उपतालुका प्रमुख, उमेश मांजरेकर, युवासेना पदाधिकारी, अनंत पाटकर, दत्तगुरु पोईपकर, प्रशांत आडवणकर, सिद्धेश मांजरेकर, अभय कदम, भूषण म्हापणकर आणि स कि सिंधुदुर्ग विद्यालयाचे प्राध्यापक वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी व कर्मचारी उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका पत्रकार समिती सदस्य संग्राम कासले यांनी मखमली खुमासदारपणे केले. पुरस्कारांच्या मानपत्रांचे वाचन पत्रकार अमित खोत यांनी केले. तालुका पत्रकार समिती उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी पुरस्कार सोहळा आयोजनात सहकार्य केलेल्या सर्व घटकांचे, प्रमुख अतिथींचे मान्यवरांचे व उपस्थित पत्रकार बांधवांच्या परिवाराचे आभार मानले. दत्तप्रसाद पेडणेकर यांनी स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय व संस्थेचे आयोजनाला सभागृह उपलब्ध करुन दिल्याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त केली.

मालवणचे माजी नगरसेवक नितीन वाळके यांनी आजच्या पत्रकारांना वाचन वाढवायचा दिलेला अध्यात्मिक कानमंत्र ठरला. पत्रकार हा नेहमी समाजातील सर्व घटकांसाठी व घटनांसाठी झटतो. स्वतःची तहानभूक हरपणार्या पत्रकार बांधवांनी त्यांच्या भविष्याचे नेटके नियोजन करावे. पत्रकारितेतील आत्मा जपताना विविध शासकीय योजनांचाही वेळोवेळी अभ्यास करावा जेणेकरुन प्रपंच सांभाळताना पत्रकार प्रसन्न राहतील असे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद उपमुख्य कार्य अधिकारी श्री राजेंद्र पराडकर यांचे मार्गदर्शन आणि पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्ष जान्हवी पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांचे पत्रकार भवन उभारणीबद्दल केलेले विशेष कौतुक हे ही या सोहळ्यातील प्रोत्साहनपर मुद्दे ठरले. आमदार वैभव नाईक यांनी समाज, राजकीय स्थानामध्ये मालवण तालुका पत्रकार समितीची केलेली प्रशंसा व मालवण तालुका पत्रकार समिती सी एक आपलाच परिवार वाटतो अशी भावना कार्यक्रमातील सात्विक व भावनिक वैशिष्ट्य ठरले.

error: Content is protected !!