शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या विजयदुर्ग विठ्ठलवाडी मित्रमंडळाच्या वतीने १३ फेब्रुवारी पासून सार्वजनिक माघी गणेशोत्सवाला सुरुवात होत असून पहिल्या दिवशी सकाळी ९ वाजता गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा, पूजा -अर्चा व आरती. रात्री १० वाजता पंढरीनाथ प्रासादिक भजन मंडळ, मठ- बुद्रुक मालवण यांचे संगीत दिंडी नृत्य. बुधवार दि. १४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता स्थानिक बालकलाकारांचा नृत्याविष्कार. गुरुवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सौरिष सागर मेस्त्री पुरस्कृत भव्य होम मिनिस्टर स्पर्धा. रात्री १० वाजता कलंदर, विजयदुर्ग निर्मित गीत गायन, आमंत्रित रेकॉर्ड डान्स, विनोदी स्किट, मंगळागौर नृत्य आणि कवी विलास खानोलकर, कणकवली यांच्या मालवणी कविता आणि कोकणातील गजाली. शुक्रवार दि. १६ फेब्रुवारी रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा व तीर्थप्रसाद.दुपारी ३ वा. पासून महिलांचे हळदीकुंकू. सायंकाळी ७ वा. बुवा आनंद जोशी, नाडण यांचे सुश्राव्य भजन. रात्री १० वा. वाडये परिवार पुरस्कृत श्रीरंग रत्नागिरी निर्मित विनोदी नाटक “हीच तर प्रेमाची गंमत आहे” लेखक- अशोक पाटोळे. दिग्दर्शक – भाग्येश खरे. शनिवारी १७ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वा. पासून ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणेश विसर्जन मिरवणूकीला प्रारंभ होईल. दरम्यान, ५ दिवसांत रोज दुपारी १ वा. गणेश आरती आणि त्यानंतर दुपारी ३ वा. पर्यंत महाप्रसाद होईल. रोज सकाळी १० ते दुपारी १ यादरम्यान अभिषेक केला जाईल. तसेच, विठ्ठलवाडी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या नाईट अंडरआर्म स्पर्धा तसेच प्रीमियर लीग ओव्हरआर्म स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ विठ्ठलवाडी रंगमंचावर होईल. या सर्व कला, क्रीडा, सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांचा लाभ सर्व गणेश भक्तांनी घ्यावा असे आवाहन विठ्ठलवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय सावंत आणि सचिव दिनेश जावकर यांनी केले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -