23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवणात भाजयुमो सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली ‘गांव चलो’ अभियान ; गवंडीवाडा येथे जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘गांव चलो अभियान’ राबवले जात आहे. याचाच भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गांव चलो अभियान प्रत्येक गावातील प्रत्येक बुथवर राबवले जात आहे. मालवण तालुक्यातील गवंडीवाडा येथे काल ११ फेब्रुवारीला भारतीय जनता युवा मोर्चा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली गांव चलो अभियान राबविण्यात आले. या ठिकाणच्या स्थानिक जनतेपर्यंत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची माहिती यावेळी देण्यात आली. सौरभ ताम्हणकर यांनी गवंडीवाडा येथील नागरिकांच्या विविध समस्या देखील जाणून घेतल्या.

याच दरम्यान भाजयुभो सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी गवंडीवाडा येथील नागरीकांसोबत दुपारचे भोजन देखील केले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात तसेच या योजनांच्या लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा या उद्देशाने गांव चलो अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना करता प्रत्येक बुथवर एका प्रवासी कार्यकर्त्याची निवड करून सदर प्रवासी कार्यकर्ता हा त्या बूथ वरील सर्व राजकीय, सामाजिक व विकासात्मक बाबींचा अभ्यास व निरीक्षण करून माहिती संकलन करण्याचे काम करत आहे.

याबरोबरच समाजातील विविध घटकांची चर्चा करून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रत्येक बुथवर किमान ५१ % मतदान मिळावे याकरता नियोजन करत आहे. या प्रवासादरम्यान सर्व ठिकाणी समाजातील सर्वच घटकांनी या कार्यकर्त्याचे स्वागत करून मोदी सरकार करत असलेल्या कामांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास सुद्धा व्यक्त केला. अनेक ठिकाणी महिला, युवा वर्गकडून कार्यकर्त्यांचे स्वागत करून नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त होत आहेत. या वेळी बुध अध्यक्ष दादा कोचरेकर व भाजयुमो कार्यकर्ते उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीच्या वतीने 'गांव चलो अभियान' राबवले जात आहे. याचाच भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गांव चलो अभियान प्रत्येक गावातील प्रत्येक बुथवर राबवले जात आहे. मालवण तालुक्यातील गवंडीवाडा येथे काल ११ फेब्रुवारीला भारतीय जनता युवा मोर्चा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली गांव चलो अभियान राबविण्यात आले. या ठिकाणच्या स्थानिक जनतेपर्यंत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची माहिती यावेळी देण्यात आली. सौरभ ताम्हणकर यांनी गवंडीवाडा येथील नागरिकांच्या विविध समस्या देखील जाणून घेतल्या.

याच दरम्यान भाजयुभो सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी गवंडीवाडा येथील नागरीकांसोबत दुपारचे भोजन देखील केले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात तसेच या योजनांच्या लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा या उद्देशाने गांव चलो अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना करता प्रत्येक बुथवर एका प्रवासी कार्यकर्त्याची निवड करून सदर प्रवासी कार्यकर्ता हा त्या बूथ वरील सर्व राजकीय, सामाजिक व विकासात्मक बाबींचा अभ्यास व निरीक्षण करून माहिती संकलन करण्याचे काम करत आहे.

याबरोबरच समाजातील विविध घटकांची चर्चा करून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रत्येक बुथवर किमान ५१ % मतदान मिळावे याकरता नियोजन करत आहे. या प्रवासादरम्यान सर्व ठिकाणी समाजातील सर्वच घटकांनी या कार्यकर्त्याचे स्वागत करून मोदी सरकार करत असलेल्या कामांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास सुद्धा व्यक्त केला. अनेक ठिकाणी महिला, युवा वर्गकडून कार्यकर्त्यांचे स्वागत करून नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त होत आहेत. या वेळी बुध अध्यक्ष दादा कोचरेकर व भाजयुमो कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!