मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरच्या हाॅटेल कोणार्क रेसिडेन्ही येथे आज ११ फेब्रुवारीला’सिंधुदुर्ग व्लाॅगर्स’ ची पहिली मीट अप संपन्न झाली. ज्येष्ठ पत्रकार ॠषी देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजीत केलेल्या या मीट अप तथा मेळाव्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्लाॅगर्सॅना सोशल मिडिया इंन्फ्लुएन्सर लकी कांबळी यांनी विशेष मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत झाले.
या मीट अपमधील सदस्यांना संबोधीत करताना पत्रकार ऋषी देसाई यांनी उपस्थित सर्व सिंधुदुर्ग व्लाॅगर्सचे स्वागत करुन या मीट अप मागील उद्देश व सिंधुदुर्ग व्लाॅगर्सच्या एकत्रीत येणे या संकल्पनेला स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यातले व्लाॅगर्स व त्यांची वाटचाल कशी सुरु झाली ती प्रत्यक्षात त्यांच्या कडूनच ऐकणे हे अनुभवी इंन्फ्लुएन्सर असूनही ‘स्टे हंग्री’ या तत्वानुसार काहीतरी नवीन दाखवून जाते से तरी विलक्षण आहे अशी भावना पत्रकार ॠषी देसाई यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित असलेले व्लाॅगर महादेव घाडीगांवकर ( लाकूडतोडो) यांच्यासारखी माणसे या संघटनेत आहेत हे गोष्टितील लाकुडतोड्याला मिळ्णार्या तीनही मौल्यवान तलवारींसारखे असल्याचे पत्रकार ॠषी देसाई यांनी आवर्जून सांगितले.
ॠषी देसाई यांनी मालवणचे सोशल मिडिया इंन्फ्लुएन्सर हनुमंत हडकर यांनी केलेल्या आयोजन सहकार्याची विशेष प्रशंसा केली. उपस्थित सर्व सोलश मिडिया व्लाॅगर्सनी त्यांचे थोडक्यात मनोगत व्यक्त केले व संपूर्ण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सिंधुदुर्ग व्लाॅगर्सच्या या पहिल्या मीटला ॠषी देसाई, लकी कांबळी, अमित वेंगुर्लेकर, पराग कुबल, हनुमंत हडकर, गौरेश कांबळी, शरद जाधव, तेजस लुडबे, मकरंद मयेकर, तेजस लुडबे, मीनू देऊलकर, रिया बांदेकर, पत्रकार सहिष्णू पंडित, अमोल सावंत, मनोज ( लारा )मयेकर, जान्हवी मयेकर, वेदांत चिंदरकर, राज गवस, सिद्धेश चव्हाण, सागर जाधव, महादेव घाडीगावकर, श्री व सौ दिव्या सायले सायले, दुर्गेश टिकम, समीर सावंत, पेंडुर येथील व्लाॅगर सुयोग उपस्थित होते.
या मीटला सोशल मिडिया इंन्फ्लुएन्सर तथा मालवणी लाईफ यू ट्यूब चॅनेलचे लकी कांबळी यांचे मार्गदर्शन हे औत्सुक्याचा विषय होते. लकी कांबळी यांनी सोशल मिडिया वरील सातत्य आणि प्रतिसाद याबद्दल त्यांचे विचार मांडले. प्रेक्षकसंख्या या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की कुठलाही व्लाॅग सादर करताना आधीच त्याच्या प्रेक्षकसंख्येचा विचार करु नका. सहज सोपे राहून विविध पैलूंवर व्लाॅगिंक करत आपले काम करा. तांत्रिकदृष्ट्या सक्षमतेसाठी आज इंटरनेट व खुद्द यू ट्यूबवर देखील तंत्र प्रशिक्षण प्रणाली उपलब्ध आहे तिचा वेळोवेळी आधार घ्यावा असा सल्ला त्यांनी दिला आणि अर्थार्जनासाठी अत्यावश्यक इच्छाशक्तीची उपस्थित सर्वांना जाणीव करुन दिली दोडामार्गचे समीर सावंत, दिव्या सायले यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. सौ. रिया हर्षल बांदेकर यांनी त्यांच्या व्लाॅगिंगसाठी त्यांच्या पतीची साथ तसेच त्यांच्या घराचे रिन्यूएशन झाल्यानंतर त्यांनी जेवणाची जुनी भांडी ॲन्टिक मटीरिअल पद्धतीने उपयोगात आणत व त्यांच्या टेरेसवरील सी व्ह्यूचा केलेला प्रेक्षणीय वापर याबद्दल सांगितले. हनुमंत हडकर, मनोज मयेकर, जान्हवी मयेकर, पेंडूरचे सोशल मिडिया इंन्फ्लुएन्सर सुयोग यांनीही त्यांच्या मीट बद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
हनुमंत हडकर, अमित वेंगुर्लेकर, मीनू देऊलकर यांनी उपस्थित मान्यवर पत्रकार ॠषी देसाई, लकी कांबळी तसेच उपस्थित सर्वांचे आभार मानले. आयोनासाठी विशेष योगदान दिलेले हनुमंत हडकर यांचा सर्वांच्या वतीने पुष्पहार घालून सदिच्छा सन्मान करण्यात आला.