युरेका सायन्स क्लब एज्युकेशनच्या संस्थपिका सौ. सुषमा केणी यांचे विशेष मार्गदर्शन.
शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग ‘देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ’ यांच्या वतीने तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात वार्षिक गुणगौरव, स्नेह व सांस्कृतिक मेळावा तालुकाध्यक्ष अशोक तेली यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने आणि इशस्तवणाने करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोकण विभाग महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे अध्यक्ष सतीश वैरागी, युरेका सायन्स क्लब एज्युकेशन च्या संस्थापिका तथा होमी भाभा बाल वैज्ञानिकच्या जिल्हा समन्वयक सौ. सुषमा केनी, सिंधुदुर्ग महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महसभाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष एकनाथ तेली, कार्याध्यक्ष गणेश धोत्रे, जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण तेली, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम तेली, देवगड तेली समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अशोक तेली, सचिव विजय शेट्ये, खजिनदार नारायण हिंदळेकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, नगरसेविका सौ. तन्वी चांदोस्कर, विश्वेश्वर पतपेढी, मुंबई कोकण विभाग अध्यक्ष जनार्दन गवाणकर, महिला आघाडी अध्यक्ष सविता तेली, सौ. प्रीती वाडेकर, माजी सचिव रवींद्र हिंदळेकर, कणकवली अध्यक्ष दयानंद हिंदळेकर, कुडाळ अध्यक्ष दिलीप तिवरेकर, वेंगुर्ला अध्यक्ष सुनील नांदोस्कर, सावंतवाडी अध्यक्ष जयराम आजगावकर, मालवण अध्यक्ष राजन आचरेकर, वैभववाडी अध्यक्ष पांडुरंग कार्लेकर, माजी खजिनदार नामदेव तेली, तज्ञ मार्गदर्शक राजेंद्र हिंदळेकर, प्रमोद शेठ, ऍड. अनुपमा रसाळ, प्रमोद आंबेरकर, पुंडलिक शेट्ये, राजेंद्र शेट्ये, मधुकर कुवळेकर, प्रशांत वाडेकर, डॉ. के.एन. नायसे, मिलिंद खानविलकर, प्रदीप वाडेकर, मनोहर तेली, दीपक तेली, नितेश तेली, प्रशांत तेली, समीर हिंदळेकर, महेश मोंडकर, सदस्य सौ. शुभांगी तेली आदींसह तेली समाज बांधव, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तेली समाज उन्नती मंडळाच्या वतीने शिक्षण विकास मंडळ, तळेबाजार चे अध्यक्ष संदीप तेली यांना “२०२४ चा व्यवसायिक नेता पुरस्कार” , जि. प. चे माजी उपाध्यक्ष तथा प्रयोगशील आंबा व्यवसायिक जनार्दन तेली यांना ” २०२४ चा कृषी रत्न पुरस्कार” तर कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर, कोर्ले सरपंच विश्वनाथ खानविलकर यांना गाव प्रतिनिधी सामाजिक ऐक्य व उपक्रमशील गाव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच इतर मान्यवरांना शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय गुणवत्ता विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी कोकण विभाग महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष सतीश वैरागी, महासभेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष एकनाथ तेली, जनार्दन गवाणकर, देवगड तालुका अध्यक्ष अशोक तेली यांनी आपली मनोगते थोडक्यात मांडली. युरेका सायन्स क्लब एज्युकेशन च्या संस्थपिका सौ. सुषमा केणी यांनी मुलांना मार्गदर्शन करताना स्वतःला कधीही कमी लेखू नका. सतत अपडेट रहा. प्रत्येक गोष्टीत काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करा. नेहमी सकारात्मक विचार करा. आपल्या मुलांसाठी आई हीच खरी “मॅनेजमेंट गुरू” असते. असे सांगितले.
या कार्यक्रमानंतर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिज्ञा खानविलकर हिने तर आभार विजय शेट्ये यांनी मानले.