ओरोस | प्रतिनिधी : प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण ) प्रपत्र ड लाभार्थी यादीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १६ हजार लाभार्थी केंद्र शासनाच्या चुकीच्या निकषामुळे अपात्र ठरले आहेत . सदर अपात्र यादीतील गरजू गरीब कुटुंबांना यादी मध्ये स्थान मिळणे त्यांच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे . यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ८ नोव्हेंबर २०२१ रोजी शिवसेना सरपंच उपसरपंच संघटना कुडाळ यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे . या बाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले . यावेळी कुंदे सरपंच सचिन कदम , पावशी सरपंच बाळा कोरगावकर , नेरूर सरपंच शेखर गावडे , हुमरस सरपंच अनुप नाईक , पावशी उपसरपंच दीपक आंगणे उपस्थित होते .
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -