26.7 C
Mālvan
Sunday, October 20, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

देवगड आणि विजयदुर्गच्या प्रादेशिक नळयोजनेच्या मुख्य पाईपलाईन व वितरणाची व्यवस्था नव्याने करण्यात येणार असल्याची जि.प.अध्यक्ष सौ.संजना सावंत यांनी केले सूचीत..!

- Advertisement -
- Advertisement -

ओरोस | प्रतिनिधी : देवगड प्रादेशिक  व विजयदुर्ग प्रादेशिक या नळयोजना कार्यान्वित ठेवण्याच्या अनुषंगाने दोन्ही नळ योजना वर अवलंबून असलेल्या गावांची जी. प. अध्यक्ष सौ. संजना सावंत यांनी आज बैठक आयोजित केली होती. देवगड तालुक्यातील देवगड प्रादेशिक या योजनेवर ९ गावे अवलंबून आहेत व विजयदुर्ग प्रादेशिक वर १२ गावे अवलंबून आहे. या तालुक्यासाठी पाण्याचा अन्य पर्याय नसल्याने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग नुकसानीत राहून देखील सदर दोन्ही योजना चालवत असल्याचे सभेच्या सुरुवातीस  जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.संजना सावंत यांनी सुचित केले. महत्त्वाच्या विषयात असलेल्या या सभेस दोन्ही नळ पाणी योजनेतील केवळ समाविष्ट असलेल्या गावांपैकी केवळ वरेरी लिंगडाळ, वाघोटन , तळवडे, चांडोशी, मणचे सरपंच उपस्थित होते.                                       यावेळी झालेल्या चर्चेत अध्यक्ष यांनी सरपंच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच ही योजना चालू ठेवत असताना जिल्हा परिषद ची भूमिकादेखील लक्षात घेणे आवश्यक असल्याचे आवाहन उपस्थित सरपंचांना केले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून योजनेतील लिकेज क्लिअर करून देण्यात येतील. थकित पाणीपट्टी भरण्यासाठी गावांना तीन महिन्याची मुदत देण्यात येत असून थकित पाणीपट्टी टप्प्याटप्प्याने भरण्याबाबत मुभा देखील गावांना देण्यात आली. या जुन्या नळ योजनांचे आयुष्य संपल्याने जल जीवन मिशन मधून मुख्य पाईपलाईन व गावातील अंतर्गत वितरण व्यवस्था बदलण्यात येणार असल्याचे अध्यक्ष यांनी जाहीर केले.  पाणी वितरणाची सर्व व्यवस्था सुरळीत झाल्यावर पाणीपट्टी वाढ करण्यात सहमत असल्याचे उपस्थित सरपंच यांनी मान्य केले. तसेच कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांनी स्पॉट व्हिजीट करून ग्रामपंचायतीच्या समस्या दूर करण्याच्या सूचना अध्यक्ष सौ. संजना सावंत यांनी दिल्या आहेत.                                 उपस्थित सरपंच व ग्रामसेवक यांनी अध्यक्षांचे आभार व्यक्त केले. यावेळी महिला व बालविकास सभापती सौ शर्वाणी गावकर, वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!