आदर्श आचार संहितेचे पालन करायचे पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांचे आवाहन.
मालवण | प्रतिनिधी : मालवण पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी नागरीकांना आदर्श आचार संहितेचे पालन करुन पोलिस प्रशासनाला सहकार्य करायचे आवाहन केले आहे. मालवण पोलिसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनानुसार विधानसभा २०२४ निवडणुका अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वांनी तिचे काटेकोरपणे पालन करावे. सोशल मीडियावरती कोणत्याही प्रकारची एखाद्या व्यक्तीची मानहानी अपमान त्याचप्रमाणे जातीय धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट कोणीही टाकू नये. पोलीस विभागाच्या सायबर शाखेतर्फे प्रसारित होणाऱ्या सर्व व्हाट्सअप व इतर माध्यमातून प्रसारित होणाऱ्या पोस्ट यावर लक्ष ठेवण्यात आलेले असून जो कोणी वादग्रस्त व वरील प्रमाणे पोस्ट टाकून त्यामुळे वातावरण खराब होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल अशा व्यक्तीविरुद्ध पोलीस विभागातर्फे अत्यंत कडक कारवाई करण्यात येत आहे.
कारवाई झाल्यामुळे व प्रचलित कायद्यामुळे गुन्हा दाखल झाल्यामुळे भविष्यात सदर व्यक्तीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकेल. त्यामुळे सर्वांना आवाहन आहे की सोशल मीडियावरती कोणतीही पोस्ट टाकताना अत्यंत खबरदारी घ्यावी व भाषाशैली कोणाच्याही भावना दुखावणार नाही अशा प्रकारची असावी. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे जमाबंदीचे आदेश लागू असल्याने बेकायदेशीर पणे गर्दी जमवू नये. कोणतेही राजकीय व इतर गर्दी जमवणारे कार्यक्रम असतील तर पोलीस विभाग व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याव इतर गर्दी जमवणारे कार्यक्रम असतील तर पोलीस विभाग व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या परवानगीशिवाय घेण्यात येऊ नयेत असे सूचना प्रवीण कोल्हे पोलीस निरीक्षक मालवण पोलिस ठाणे यांनी सांगितले केले आहे.