शिरगांव |संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील साळशी देवणेवाडी येथील प्रतिष्ठीत रहिवाशी देवणे कॅश्यूचे मालक विठठल जयराम देवणे(४१) यांचे बुध.२७ ऑक्टो.रोजी मुंबई येथे उपचारादरम्यान अल्पशा आजाराने सायं.५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुलगे,एक भाऊ,भावजय, ३ बहिणी, भावोजी,एक पुतण्या,एक पुतणी असा परिवार आहे. ते साळशी देवणेवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष होते.तसेच ते भूमी स्वयंसहाय्यता अपंग बचतगटाचे सचिव होते.या बचतगटाच्या मार्फत त्यांनी काही महिन्यांपूर्वी साळशी आणि चाफेड या दोन गावांसाठी रेशन धान्य दुकान चालू केले होते.आपल्या गावात काजू कारखाना काढून त्यांनी गावातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला.स्वतः दिव्यांग असूनही ते नेहमी समाजकार्यात पुढे असायचे. अतिशय मेहनत आणि जिद्द बाळगून त्यांनी आपला व्यवसाय उभारला.त्याच जोडीला त्यांनी काही महिन्यांपूर्वी बचतगटामार्फत गावात रेशन धान्य दुकान चालू केले.सर्वांशी त्यांचे सलोख्याचे आणि प्रेमाचे संबंध होते.मनमिळाऊ असा त्यांचा स्वभाव होता.
त्यांच्या अंत्ययात्रेला सरपंच वैभव साळसकर,शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर,माजी प.स.सदस्य तथा माजी सरपंच सुनील गांवकर, माजी सरपंच अनिल पोकळे, माजी सरपंच किशोर साळसकर, माजी उपसरपंच राजेंद्र साटम,विक्रांत नाईक,शिवसेना शाखाप्रमुख कैलास गावकर, चाफेड तंटामुक्त समिती अध्यक्ष दाजी पाटील,माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रवीण राणे,माजी सरपंच आकाश राणे,चाफेड शाखाप्रमुख उदय राणे, चाफेडचे माजी सरपंच संतोष साळसकर,माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय परब आदींसह साळशी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.